Johnson & Johnson पावडरमुळे कॅन्सर; १४,५०० कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागणार

Cancer From Powder Johnson & Johnson Will Have To Pay 14500 Crore Rupees Compensation
Johnson & Johnson पावडरमुळे कॅन्सर; १४,५०० कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागणार

जॉनसन अँड जॉनसन (Johnson & Johnson)च्या बेबी पावडर आणि टॅल्कम पावडरमुळे महिलांना कँन्सर झाल्यामुळे समोर आले आहे. त्यामुळे आता जॉनसन अँड जॉनसन कंपनीला १४ हजार ५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. याप्रकरणी मंगळवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निम्न न्यायालयाच्या आदेशावर सुनावणी देण्यास नकार दिला आहे. कंपनीने भरपाईच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.

ज्या महिलांना जॉनसन अँड जॉनसन पावडर आणि याच्या संबंधित उत्पादनाच्या वापरामुळे कॅन्सर झाला आहे, त्या महिलांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. कंपनीने सुनावणी दरम्यान या प्रकरणाबाबत योग्यरित्या आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी पहिल्यांदा न्यायालयाने नुकसान भरपाई ४०० कोटी डॉलर निश्चित केली होती. पण उच्च न्यायालयात अपील झाल्यानंतर ही नुकसान भरपाई रक्कम निम्म्यावर आणली. दरम्यान जॉनसन अँड जॉनसन पावडर महिला आणि मुलांसाठी घातक असल्याचे मानले जाते. खटल्यानुसार, या कंपनीच्या पावडरमुळे काही महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात २२ महिलांनी दावा दाखल केला होता.

या प्रकरणातील पीडित महिलांचे वकील मार्क लेनिअर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, ‘न्यायालयाचा निर्णय असा संदेश देतो की, तुम्ही कितीही श्रीमंत किंवा शक्तीशाली असाल तरी, जर तुमच्यामुळे लोकांचे नुकसान होत असेल तर कायद्याच्या समोर सर्वांना समान वागणूक देणारी देशाची व्यवस्था तुम्हालाही नक्कीच दोषी ठरवेल.’

अमेरिका आणि कॅनडाने पावडरच्या विक्री घातली बंदी

पण जॉनसन अँड जॉनसन कंपनीने पावडर सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अमेरिका आणि कॅनडामधील मागणी घटल्यामुळे आणि बाजारातील सध्याची वाईट भावना लक्षात घेऊन या पावडरच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.


हेही वाचा – Unemployment crisis: कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट वाढणार; UNचा इशारा