Vaxinia Virus मुळे होणार जीवघेणा Cancer आजार बरा; पहिल्यांदाच मानवावर झाला यशस्वी प्रयोग

मेटास्टॅटिक आणि शेवटच्या टप्प्यातल्या कॅन्सर ट्यूमर्स उपचारांसाठी महत्त्वाचा टप्पा या संशोधनामुळे गाठला गेला असल्याचं मत Imugene चे एमडी आणि सीईओ Leslie Chong यांनी व्यक्त केलं.

cancer killing virus vaxinia first injected in human clinical trial
Vaxinia Virus मुळे होणार Cancer आजार बरा; पहिल्यांदाच मानवावर झाला यशस्वी प्रयोग

कोरोना व्हायरसमुळे आजही जगभरातील नागरिकांच्या मनात व्हायरसचे नाव घेतल्यास भीतीचे वातावरण निर्माण होते. दरम्यान कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या संकटातून देश सावरत नाही तोवर मंकीपॉक्स आजाराने नवे संकट निर्माण केलेय. त्यामुळे व्हायरसचे नाव घेताच धडकी भरते. पण असा एक व्हायरस आहेत ज्यामुळे नागरिकांचा जीव वाचवण्यास मदत होत आहे. हा व्हायरस कोणाचा जीव घेणार नसून जीवघेण्या कॅन्सरमधून अनेकांचा जीव वाचवणारा आहे. प्राण्यांवर झालेल्या यशस्वी संशोधनानंतर आता मानवावर याची यशस्वी चाचणी करण्यात आली. व्हॅक्सिनिया असे या व्हायरसचे नाव असून हा एक कॅन्सर किलिंग व्हायरस आहे. कॅन्सरचा खात्मा करणारा हा विषाणू पहिल्यांदाच मानवी शरीरात सोडण्यात आला.

केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी पद्धत वापरून कर्करोगावर उपचार केले जातात. काही वेळा सर्जरीदेखील केली जाते. मात्र, या सगळ्या नंतरही कर्करोग म्हणजे कॅन्सर पूर्णपणे बरा होण्याची शाश्वती नसते. अगदी पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास कॅन्सरमधून रुग्ण बरा होण्याची शक्यता असते. मात्र लास्ट स्टेजच्या कॅन्सरवर कितीही उपचार करुन उपयोग होत नाही. त्यामुळे आजही जगभरात कॅन्सरवर नवनवे प्रभावी उपचार शोधण्यासाठी वैद्यकीय शास्त्रज्ञ दिवस रात्र मेहनत घेत आहे. अशात कॅन्सर नष्ट करणारा व्हायरस सापडल्याने दिलासा मिळत आहे. हा कॅन्सर किलिंग व्हायरस रुग्णाच्या शरीरातील आतडी, स्तन, गर्भाशय, स्वादुपिंड आदी अवयवांमध्ये तयार झालेल्या कॅन्सर ट्यूमरचा आकार कमी करण्यास यशस्वी ठरत असल्याचे प्राण्यांवर आणि प्री-क्लिनिकल लॅबोरेटरीत केलेल्या प्रयोगात आढळलं आहे. आता माणसांवरही याची चाचणी सुरू झाली आहे.

सावधान ! बॉडी बिल्डिंगसाठी तुम्ही घेत असलेल्या प्रोटीन पावडरमध्ये आहेत ‘हे’ १३० विषारी केमिकल्स

अमेरिकेतल्या कॅन्सर संशोधन आणि उपचारांबद्दल काम करणाऱ्या मोठ्या संस्थांपैकी एक असलेल्या City of Hope संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या प्रयोगाची माहिती दिली आहे.

ऑनकोलायटिक सिटी ऑफ होप संस्थेतल्या मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि थेराप्युटिक्स रिसर्च विभागातले प्रमुख संशोधक दानेंग ली यांनी सांगितलं की, ‘ऑन्कॉलायटिक (ऑनकोलायटिक) व्हायरस शरीरातल्या अँटी बॉडीला प्रोत्साहन देऊन कॅन्सरला प्रतिसाद देण्याची आणि मारण्याची क्षमता देऊ शकतात, असं यापूर्वीच्या संशोधनात आढळले. तसंच हा व्हायरस अन्य इम्युनोथेरपीजना अधिक प्रतिसाद देण्यासाठीही अँटीबॉडीसला प्रोत्साहन देतात. आता इम्युनोथेरपीची ताकद अधिक आजमावण्याची गरज आणि काळ आहे. CF33-hNIS (Vaxinia) व्हॅक्सिनिया या कॅन्सर-किलिंग व्हायरसमध्ये रुग्णांचा कॅन्सरविरुद्धचा लढा अधिक सोप्पा आणि कमी करण्यासाठी क्षमता दिसून येत आहे.’

तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा ‘ही’ गोष्ट भासणार नाही कधीही पैशांची कमतरता

ज्या कॅन्सर रुग्णांना सध्याच्या जुन्या उपचारपद्धतींमधील किमान दोन टप्प्यांतले उपचार दिले गेले आहेत, अशा मेटास्टॅटिक किंवा अ‍ॅडव्हान्स्ड सॉलिड ट्यूमर्स (Advanced Solid Tumours) असलेल्या पेशंट्सना या व्हायरसचा Low Dose दिला जाणार आहे. हा डोस एक तर थेट ट्यूमरमध्ये इंजेक्शनद्वारे दिला जाईल किंवा इंट्राव्हेनस इंजेक्शनद्वारे दिला जाणार आहे. ही चाचणी सुमारे दोन वर्षं चालणार आहे. त्यादरम्यान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातल्या सुमारे 100 पेशंट्सवर उपचार केले जाणार आहेत.

मेटास्टॅटिक आणि शेवटच्या टप्प्यातल्या कॅन्सर ट्यूमर्स उपचारांसाठी महत्त्वाचा टप्पा या संशोधनामुळे गाठला गेला असल्याचं मत Imugene चे एमडी आणि सीईओ Leslie Chong यांनी व्यक्त केलं. दरम्यान भारतात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण सध्या कमी असले तरी आज अमेरिका किंवा युरोप खंडापेक्षा आशियामध्ये कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या जीवघेण्या आणि आवक्या बाहेर असलेल्या कॅन्सरवर लवकरात लवकर उपचार पद्धती येणे गरजेचे आहे.


Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट