घरदेश-विदेश'त्याने' केला आत्महत्येचा लाईव्ह व्हिडिओ

‘त्याने’ केला आत्महत्येचा लाईव्ह व्हिडिओ

Subscribe

दार्जिलिंग येथील पूर्णा विवेकानंद पल्लीचे रहिवासी अरिंदम दत्ता(४३) यांनी केली आजाराला कंटाळून केली आत्महत्या.

रक्ताचा कर्करोग असलेल्या इसमाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडील आहे. या आत्महत्येचा व्हिडिओ त्याने फेसबुकवरुन लाईव्ह प्रकाशीत केल्याने हा व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अरिंदम दत्ता (४३) असे या इसमाचे नाव असून तो दार्जिलिंग पूर्णा विविकानंद पल्ली परिसरात राहतो. नायलॉनची दोरी गळ्याभोवती आवळून पंख्याला लटकून आत्महत्या केली. आत्महत्येवेळी त्याच्या पाच मित्रांनी हा लाईव्ह व्हिडिओ बघून त्याला कमेंटद्वारे थांबवण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी त्याला मोबाईलवर फोन केला मात्र त्याने फोन उचलला नाही. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. आत्महत्येपूर्वी अरिंदमने त्याच्या लहानपणीचा मित्र मोहम्मद आलम याला फोन केला होता.

मनसिक त्रासामुळे उचलले पाऊल

फेसबुक प्रोफाइलवरुन मिळालेल्या माहितीनुसार अरिंदम स्वयंरोजगारीत असून त्याने जलपाईगुडीयेथील एसी वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. अरिंदमयाचा घटस्फोट झाल्यानंतर तो मानसिक तणावात होता. घटस्फोटाच्या काही दिवसानंतर त्याच्या रक्तामध्ये कर्करोगाचे निदान झाले. अरिंदम हा आपल्या मुलीबरोबर रहात होतो. याच परिसरात त्याचे एक छोटेसे दूकान होते. कौटुंबिक वादामुळे हे दूकान त्याला विकावे लागले. यानंतर त्याचा मानसिक त्रास अजूनही वाढला.

- Advertisement -

“अरिंदमचा फोन आला त्यावेळी मी कामात व्यस्त होतो म्हणून मी त्याचा फोन उचलो शकलो नाही. मात्र तो अशा प्रकारचे पाऊल उचलेल याची कल्पना मला नव्हती. त्याने माझ्या पत्नीला फोन करुन जीवनात खूप मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले होते. मागच्याच आठवड्यात एका कार्यक्रमा दरम्यान आम्ही भेटलो होतो. त्यावेळी तो मला मानसिक त्रास बद्दल बोलला होता मात्र अशा प्रकारचे पाऊल उचलेल याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे त्याने सांगितले तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने उपचारासाठी आम्हाला मदतही मागीतली होती” – मोहम्मद आलम अरिंदमचा मित्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -