Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश भारताच्या DNA लसीचे जगभरात कौतुक! या लसीच्या तंत्राने बनवता येणार कॅन्सरची लस;...

भारताच्या DNA लसीचे जगभरात कौतुक! या लसीच्या तंत्राने बनवता येणार कॅन्सरची लस; नेचर जर्नलमध्ये दावा

Related Story

- Advertisement -

कोरोनावर लढा देणारी डीएनए तंत्रज्ञानावर विकसित केलेल्या स्वदेशी लसीचे संपूर्ण जगभरातून कौतुक केले जात आहे. झायडस कॅडिलाची लस ZyCoV-D ही पहिली डीएनए लस आहे. जी केवळ कोरोनाविरूद्धच नव्हे तर जगातील कोणत्याही आजाराविरूद्ध बनविली गेली आहे. डीएनए तंत्रज्ञानावर आधारित ही लस भविष्यात कर्करोगासारख्या रोगासाठी लस तयार करण्याचा मार्ग मोकळा करू शकते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. गेल्या महिन्यात DCGI ने कोरोनाविरूद्ध त्याची प्रभावीता आणि सुरक्षा मानके पूर्ण केल्यानंतर आपत्कालीन वापरास परवानगी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ हजार लोकांवर केलेल्या चाचणीत, ZyCoV-D कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ६७ टक्के प्रभावी ठरली आहे. यावरून हे सिद्ध झाले की, डीएनए तंत्रज्ञानावर आधारित लस कित्येक रोग रोखण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. नेचर जर्नलने डीएनए लसीला आरएनए लसीपेक्षा उत्तम असल्याचे म्हटले आहे. मॉडर्नाने कोरोना उपचारावर तयार केलेली लस ही आरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. तसेच डीएनए लसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्य तापमानात स्थिर राहते, तर आरएनए लस -२० ते -८० अंश तापमानात ठेवावी लागते.

- Advertisement -

दरम्यान, आरएनए लस कोरोनाच्या विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु त्यांची चाचणी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या येण्यापूर्वी झाली होती, त्या दरम्यान ती तुलनेने कमी संसर्गजन्य होती, तर संसर्गजन्य डेल्टा व्हेरिएंटवर ZyCoV-D ने त्याची प्रभावीता सिद्ध केली आहे.

डीएनए लस म्हणजे…

डीएनए लस तयार करण्याच्या या तंत्रात शरीराच्या डीएनएचा वापर करून रोगप्रतिकारक प्रथिने तयार केली जातात. हे प्रोटीन व्हायरसच्या संसर्गास प्रतिबंध करते आणि शरीराच्या पेशींना कोरोना संसर्गापासून वाचवते. डीएनए तंत्रज्ञानावर तयार केलेली ही लस जटिल प्रथिने किंवा अनेक प्रथिनांचे एकत्रित वापरू शकते. यामुळे कर्करोगासारख्या जटिल रोगांवर लस मिळण्याची अपेक्षा आहे.


पुण्यातल्या मेट्रो स्टेशन्सला महापुरुषांची नावं द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी

- Advertisement -

 

- Advertisement -