घरताज्या घडामोडीHaryana: हरियाणातील अंबालाच्या जंगलात सापडले तोफांचे गोळे, परिसरात उडाली एकच खळबळ

Haryana: हरियाणातील अंबालाच्या जंगलात सापडले तोफांचे गोळे, परिसरात उडाली एकच खळबळ

Subscribe

हरियाणातील अंबालाच्या जंगलात मंगलोर गावाजवळील बेगना नदीच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तोफखाना जप्त केला आहे. एकही प्रयोग न करण्यात आलेल्या गंज पकडलेल्या तोफांच्या गोळ्याची संख्या २३२ इतकी आहे. सध्याच्या स्थितीत अशा प्रकारच्या तोफांच्या गोळ्यांचा वापर केला जात नाही. तसेच ज्या ठिकाणी हे गोळे सापडले आहेत. त्या ठिकाणी लष्कराची फायरिंग रेंज नाहीये किंवा आजपर्यंत या भागात कधीही फायरिंग रेंज झालेली नाहीये.

सिमेंटच्या कुंड्यांमध्ये भरून जंगलात फेकले गोळे

मिळालेल्या माहितीनुसार, शहजादपूर विभागातील मंगळूर गावात बेगना नदीचे जंगल आहे. येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास म्हशींना जंगलात चरण्यासाठी घेऊन आलेल्या लोकांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एक सामान पडलेलं दिसलं. त्यांना तो बॉम्ब सारखा वाटला. त्यामुळे त्यांनी ही माहिती वनरक्षकाला दिली.

- Advertisement -

वनरक्षक विशाल यांनी घटनास्थळी धाव घेत त्याची संपूर्ण चाचणी केली असता शहजादपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली. त्यासोबतच पोलिसांनी लष्कराला याची माहिती दिली. आता या गोळ्यांना लष्कराच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शहजादपूर पोलीस ठाण्यात स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेले तोफांचे गोळ हँडगनमध्ये वापरता येऊ शकत नाहीत. त्यांचा वापर विशेषतः युद्धाच्या वेळी किंवा प्रशिक्षणादरम्यान केला जात असे. कायदेशीररित्या हे गोळे सैन्यात वापरले जात नाहीत. या गोळ्यांवर नंबर लिहिलेले असतात, त्यामुळे हे गोळे कोणत्या युनिटला दिले होते हे समजते. मात्र, लष्कर या गोळ्यांची तपासणी करत असून हे गोळे कोणत्या युनिटला कधी देण्यात आले आणि ते कसे पोहोचले याचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Lavasa Verdict : लवासा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -