घरताज्या घडामोडीCaptain Amrinder Singh : पंजाब काँग्रेसला झटका? कॅप्टन अमरिंदर दिल्लीत अमित शाहांना...

Captain Amrinder Singh : पंजाब काँग्रेसला झटका? कॅप्टन अमरिंदर दिल्लीत अमित शाहांना भेटण्याची शक्यता

Subscribe

कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्ली दौऱ्यावर जाणार असून हा त्यांचा अनौपचारिक दौरा असणार आहे.

पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले असून मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल होतील. कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु अमरिंदर सिंह यांचा दिल्ली दौरा अनौपचारिक असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅप्टन यांच्या दौऱ्याची चर्चा सुरु असताना आता काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्ली दौऱ्यावर आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सोशल मीडिया सल्लागाराने ट्विट करुन माहिती दिली आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्ली दौऱ्यावर जाणार असून हा त्यांचा अनौपचारिक दौरा असणार आहे. कॅप्टन आपल्या मित्रांना भेटणार असून त्यांचे कपूरथला घर खाली करणार आहेत. यामुळे कोणत्याही राजकीय चर्चा करण्यात येऊ नये असे कॅप्टन यांच्या सल्लागाराने म्हटलं आहे.

- Advertisement -

पंजाब मंत्रिमंडळात कॅप्टनच्या लोकांना डावललं

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये १५ कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात ७ नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या ५ आमदारांना जागा देण्यात आली नाही. यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

नवज्योत सिंह सिद्धूंचा राजीनामा

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे. पदाचा राजीनामा देत असलो तरी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसमध्ये नाराज होते. पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळात सिद्धूंच्या लोकांना मंत्रीपद देण्यात आले परंतु त्यांना चांगली खाती देण्यात आली नाही. चन्नी मुख्यमंत्री झाल्यावर सिद्धू सुपर मुख्यमंत्री म्हणून वावरत असल्याचा आरोप होत होते. तसेच सिद्दधूंना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली नाही. यामुळे मोठा सिद्धू नाराज होते.


हेही वाचा : नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाब कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, सोनिया गांधींना पाठवले पत्र


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -