जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेडचा अचानक स्फोट; दोन लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसह सुरक्षारक्षकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून गोळाबार आणि हल्ल्यात अनेक सुरक्षारक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसह सुरक्षारक्षकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून गोळाबार आणि हल्ल्यात अनेक सुरक्षारक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेडचा स्पोट झाला असून, यामध्ये दोन लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कॅप्टन आनंद (Captain Anand) आणि नायब-सुभेदार (जेसीओ) भगवान सिंह (Bhagwan Singh) असे ग्रेनेडच्या अपघातात मृत्यू झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांची नावे आहे. (Captain Anand and Nb Sub Bhagwan Singh dead in a grenade blast performing their duties on the LoC in Mendhar Sector)

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) अचानक ग्रेनेडचा (Grenade Blast) स्फोट झाला. यामध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या स्पोटात पाच जवानही जखमी झाले आहेत.

मेंढर सेक्टरमध्ये ही घटना घडली असून, जखमी लष्करी त्यावेळी या ठिकाणी गस्तीवर होते. घटनेनंतर जखमी कॅप्टन आणि जेसीओ यांना उपचारासाठी उधमपूरला नेण्यात आले, मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रविवारी रात्री उशिरा पुंछमधील मेंढार सेक्टरमध्ये (Medhar Sector) ही घटना घडली. घटनेवेळी लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमींना तातडीने उधमपूरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

रविवारी दुपारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक सहायक उपनिरीक्षक शहीद झाले होते. तसेच, अन्य एक प्रवासी जखमी झाला होता.

या घटनेनंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. शहीद एएसआय विनोद कुमार हे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील रहिवासी होते.


हेही वाचा – २७ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच देशातील सर्वात वयस्कर ‘राजा’ वाघाचा मृत्यू