घरदेश-विदेशTokenisation : ऑनलाईन कार्ड पेमेंट करताय? मग आता CVV ची गरज नाही

Tokenisation : ऑनलाईन कार्ड पेमेंट करताय? मग आता CVV ची गरज नाही

Subscribe

स्विगी, झॉमेटो, ॲमेझॉनसारख्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक सेव्ह करुन ठेवण्याची गरज लागणार नाही. तसेच प्रत्येक वेळी ऑनलाईन व्यवहार करताना तुम्हाला ओटीपी किंवा पिन क्रमांक टाकण्याची गरज लागणार नाही. कारण जानेवारी २०२२ पासून आता कार्ड पेमेंट करण्याची पद्धत बदलणार आहे. यासाठी तुम्हाला नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये ऑनलाईन पेमेंट सुरक्षेबाबत लक्ष देण्यात आलं आहे.

आरबीआयने ऑनलाइन पेमेंट संबंधित टोकनायझेनचे नियम जारी केले आहेत. १ जानेवारी २०२२ पासून हे नियम देशात लागू होतील. यामध्ये तुमच्या कार्डची माहिती अन्य कोणाकडेही म्हणजे व्यापारी, ऑनलाईन मर्चंट, पेमेंट गेटवे आणि पेमेंट ॲग्रीगेटर कंपन्यांकडे न जाता व्यवहार करता येणार आहेत. म्हणजे आता पेमेंटसाठी टोकन सिस्टम लागू होणार आहे. या टोकन सिस्टमसाठी आरबीआयने नवीन नियम जाहीर केले आहेत.

- Advertisement -

टोकनायझेशन नेमकं असतं काय?

आरबीआयने ऑनलाईन कार्ड पेमेंटसाठी टोकनायझेशन ही नवीन पद्धत जाहीर केली आहे. या पद्धतीमुळे ऑनलाईन व्यवहार अधिकचं सुरक्षित होणार आहेत. टोकन म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या कार्डचा क्रमांक किंवा माहितीसाठी असलेला पर्यायी सांकेतिक क्रमांक. (Atlernate Code) या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. (Digital Payment Ecosystem) आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी मागील वर्षीच होणार होती.. मात्र कंपन्या आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली.

ग्राहकांच्या परवानगीची आवश्यकता

आरबीआयच्या टोकनायझेशनमुळे आता पेमेंट एग्रीगेटर, व्यापाऱ्यांना ग्राहक कार्ड डेटा गोळा करण्याची परवानगी नसेल. तसेच टोकन प्रणालीमुळे प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपूट करण्याची आवश्यकता नसेल. मात्र टोकन सिस्टमसाठी ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल यासाठी ग्राहकावर कोणताही दबाव टाकता येणार नाही. याशिवाय कोणत्याही बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडून याची सक्ती केली जाणार नाही असेही आरबीआयने स्पष्ट केले.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -