घरताज्या घडामोडीआता कार्डाशिवाय काढा ATM मधून पैसे, त्यासाठी 'ही' आहे योग्य पध्दत!

आता कार्डाशिवाय काढा ATM मधून पैसे, त्यासाठी ‘ही’ आहे योग्य पध्दत!

Subscribe

आता तुम्हाला तुमच्या ATM कार्डाशिवाय पैसे काढता येणार आहेत. अनेक बँकांनी विविध ठिकाणी ही सुविधा सुरू केली आहे. या कोरोनाच्या काळात या स्कीमने मोठ्याप्रमाणावर जोर पकडला आहे. कारण या काळात अनेकांना ATM मधून पैसे काढण्याची गरज भासली. त्यामुळे या सुविधेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याकरता केवळ तुम्हाला बँकेच्या App ला मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे.

लोकांच्या सुरक्षीततेसाठी अनेक बँकांनी ही सुविधा द्यायला सुरूवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एक्सिस बँक या बँकांनी सध्या कार्डलेस बँकींगला सुरूवात केली आहे. या सुविधेमुळे ग्राहक ATM कार्डाशिवाय ATM मधून पैसे काढू शकतो. फक्त ही सुविधा बँकेच्याच ATM मध्ये काम करेल. अन्य ATM मध्ये या सुविधेचा वापर करता येणार नाही.

- Advertisement -

या सुविधेमुळे ऑनलाईन घोटाळ्यांवरही आळा बसेल. अनेकवेळा कार्ड चोरीला जाणं, ओटीपी चा चुकीचा वापर होणं यासारख्या घटना घडतात.

अशी आहे नवी सुविधा

डेबिट कार्डाशिवाय पैसे काढण्याची प्रक्रिया प्रत्येक बँकेची वेगवेगळी आहे. ग्राहकांना आपल्या बँकेचे APP डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर बँक एक पासवर्ड क्रिऐट करेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. साधारण १५ मिनीटापर्यंत हा ओटीपी ग्राह्य धरण्यात येईल. तुम्हाला ATM मधून पैसे काढताना याच ओटीपीचा उपयोग करायचा आहे. मात्र या सुविधेचा वापर करून तुम्ही केवळ ५ हजार – २० हजारापर्यंतच कॅश काढू शकता. काही बँका याचे अतिरीक्त शुल्कही घेतात.

- Advertisement -

हे ही वाचा – गाफील राहू नका, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते – मुख्यमंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -