करोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांची ‘करोना कमांडो टीम’ तैनात

जगभरात हाहाकार उडवणाऱ्या करोना व्हायरसला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कमांडोंची टीम तयार केली आहे. मात्र ही टीम डॉक्टरांची असून हे डॉक्टर देशभरात कुठेही करोनाग्रस्तावर उपचार करण्यासाठी जाणार आहेत. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे किंग ़र्ज मेडिकल कॉलेजच्या पल्मोनरी विभागात या डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे कमांडोज देशातील कुठल्याही भागात जाऊन करोनाग्रस्त रुग्णावर उपचार करणार आहेत. आधुनिक वैद्यकिय उपकरणांनी सज्ज असलेली ही टीम आहे. या कमांडोजला QRRT क्विक रिस्ॉन्स टीम असेही संबोधले जात आहेत.

गेल्या महिन्याभरापासून या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लखनौमधील किंग ़र्ज मेडिकल कॉलेजच्या पल्मोनरी विभागात देशातील सर्वोत्तम आयसीयू असून इतर शहरांच्या तुलनेत ते आधुनिक वैद्यकिय प्रणालीने सुसज्ज आहे. यामुळे करोनाग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकिय उपकरणे हाताळण्यात येथील डॉक्टर माहिर आहेत. याच डॉक्टरांची टीम रुग्णालय प्रशासनाने तयार केली आहे. ही टीम देशभारतील इतर रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण देणार असून करोनाग्रस्त रुग्णांवर उपचारही करणार आहेत. यामुळे करोनाला रोखण्यात यश मिळेल असा विश्वास किंग ़र्ज मेडिकल कॉलेजच्या पल्मोनरी विभागाचे प्रमुख डॉक्टर वेदप्रकाश यांनी व्यक्त केला आहे.