घरताज्या घडामोडीबर्थडे पार्टी आणि करोना व्हायरसची एन्ट्री

बर्थडे पार्टी आणि करोना व्हायरसची एन्ट्री

Subscribe

ज्या करोनाने चीनमध्ये तीन हजाराहून अधिक नागरिकांचा बळी घेतला त्याने आता भारतातही एन्ट्री केल्याने देशभरात भाीतिचे वातावरण पसरले आहे. जागितक आरोग्य संघटनेनेही जगभरातील देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हा करोना एका बर्थडे पार्टीतून एन्टर झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील १८ जणांना याची लागण झाल्याचा संशय असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

इटलीतून आलेल्या एकाने दिल्लीत आल्यानंतर मित्रांना बर्थडे पार्टीसाठी घरी बोलावले होते. २५ जण या पार्टीत सहभागी झाले होते. रात्री उशीरापर्यंत पार्टी सुरू होती. पण मध्ये मध्ये बर्थडे बॉय खोकलत व शिंकरत होता. ही सर्दीची लक्षणे असल्याने सगळ्यांनी त्याला फुकटचे सल्ले दिले व पार्टीनंतर आपल्या घरी परतले. पण त्यानंतर काही अवधीतच कित्येकजण खोकला व शिंकाबरोबर तापाने फणफणले आणि ज्याच्या घरी पार्टीला गेलो होतो तो करोनाचा रुग्ण आहे हे त्यांना कळाले. मग काय सगळीकडे एकच खळबळ उडाली. पार्टीला लहान मुलेही गेली होती. त्यांनी मात्र अंथरुणच धरले. त्यानंतर ज्या शाळेत ही मुलं जायची ती शाळाच बंद करण्यात आली. ४० मुलांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. नंतर दिल्लीतील सरकारने पार्टीत सहभागी झालेल्यांना हुडकून काढण्यासाठी शोध मोहिम राबवली. पण यातील काहीजण आग्रा येथील होते. पार्टी संपल्यानंतर त्यातील अनेकजण फ्लाईट पकडून निघून गेले तर काहीजण दिल्लीत नातेवाईकांकडे थांबले. यातील सहा जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आणि देशात करोनाने एन्ट्री केल्याची खळबळजनक बातमी वाऱ्यासारखी देशासह परदेशात पसरली.

- Advertisement -

चीनमध्ये थैमान घातलेल्या या करोना व्हायरसने तेथे तीन हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर ५४ देशांमध्ये करोनाची लागण लाखभर नागरिकांना झाली आहे. ईराणच्या भूमीतही करोना धडकला असून २१० लोकांचा बळी त्याने घेतला आहे. इटलीमध्ये १७०० लोकांना याची लागण झाली असून ५५ जण दगावले आहेत. दक्षिण कोरियात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४००० जणांना याची लागण झाली आहे. जगातील दुसरे शक्तिशाली देश असलेल्या चीननेही करोनापुढे गुडघे टेकले आहे. तर WHO ने संपूर्ण जगाालाच धोक्याचा इशारा देत सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. हळूहळू करोना जगभऱात हातपाय पसरवत आहे. भारतातही येऊन धडकलेल्या करोनाचे ६ रुग्ण आग्रा येथे आढळले आहेत. तर दिल्ली व तेलंगणामद्येही करोना पोहचला आहे. तर दुसरीकडे नोएडा आणि राजस्थानमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आखाती देशातही करोना पोहचला आहे. दिल्लीत व तेलंगणामध्ये प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. तर दुबईहून तेलंगणाला आलेल्या व्यक्तीलाही या आजाराचा संसर्ग झाला आहे. आगरा मधील एकाच घरात राहणाऱ्या दोन भावाना व इतर कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात सर्व कुटंबाला स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले आहे. आग्रा येथील दोन व्यावसायिक कुटुंबिय व दिल्लीतील त्यांचे नातेवाईक असे संपूर्ण कुटुंब इटली फिरायला गेले होते. यातील दिल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीला सतत खोकला व शिंका आणि ताप येत होता. त्यामुळे त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली त्यावेळी तो करोनाग्रस्त असल्याचे समोर आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -