घरदेश-विदेशतुम्ही एक लग्न करता आणि...; हिंदुंबाबत AIMIM नेत्याचं वादग्रस्त विधान

तुम्ही एक लग्न करता आणि…; हिंदुंबाबत AIMIM नेत्याचं वादग्रस्त विधान

Subscribe

नवी दिल्ली : हिंदुंबाबत एका कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एआयएमआयएमचे (AIMIM) उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौकत अली म्हणाले होते की, जे मुस्लिमांना धमकावत आहेत, ते एका महिलेशी लग्न करतात पण अनेक बायका ठेवतात आणि मुलं जन्माला घालतात. संभल येथील एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसऱ्याच दिवशी जातीय सलोखा बिघडवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AIMIM नेत्याच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुसलमान दोन लग्न करत असले तरी ते दोन्ही स्त्रियांचा आदर करतात. तुम्ही एक लग्न करतात आणि बाहेर तीन-तीन बायका फिरवतात.

- Advertisement -

शौकत अली म्हणाले की, जेव्हा भाजप कमजोर होतो ते तेव्हा ते मुस्लिमांच्या मागे लागतात. म्हणतात, मुस्लिमांना जास्त मुलं होतात, कधी कधी म्हणतात की, मुस्लीम अनेक विवाह करतो. होय, हे खरे आहे की, आम्ही दोन लग्न करतो पण दोन्ही पत्नींना सन्मान देतो. पण तुम्ही एक लग्न करता आणि बाहेर तीन तीन ठेवता, ज्याबद्दल कोणालाच माहिती नाही. तो त्यांच्यापैकी कुणालाही मान देत नाही. मुघल सम्राट अकबराच्या राजपूत राजकन्या जोधाबाईशी झालेल्या लग्नाचा संदर्भ देत शौकत म्हणाले की, “मुस्लिमांनी तुमच्या लोकांना त्यांच्यासोबत वाढवले, पण तेच लोक आम्हाला धमकावत आहात. यावरून शौकत अली यांनी मुस्लिमांना धमकावणाऱ्यांना किडा असे म्हटले आहे.

- Advertisement -

शौकत अली इतक्यावरचं थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की, तुम्ही आम्हाला धमकावत आहात? आम्ही 832 वर्षे तुमच्यासारख्या कीटकांवर राज्य केले, तुम्ही आम्हाला हात मागे करत ‘जी हुजूर’ करत होता, आता तुम्ही आम्हाला धमकावत आहात. आमच्यापेक्षा धर्मनिरपेक्ष कोण? अकबराने जोधाबाईशी लग्न केले. आम्ही आमच्या लोकांचे तसेच आमचे उत्थान केले. पण तुम्हाला एक समस्या आहे. एक साधू म्हणतो की, मुसलमानांना मारले पाहिजे. का? आम्ही काही गाजर, मुळा, कांद्यासारखे आहोत का?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त होत आहे. मात्र यानंतर आता अलीन यांनी सर्व दावे फेटाळत मी माझ्या भाषणात कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नसल्याचे म्हटले आहे. शौकत अली यावर स्पष्टीकरण देत म्हटवले की, ‘आम्ही 2 महिलांशी लग्न केले तरीही आम्ही त्यांना समान मान देतो, काही लोक एकच लग्न करतात पण 3 बायका बाहेर ठेवतात आणि त्यांना समाजापासून लपवतात. मी फक्त अशा पुरुषांबद्दल बोलत होतो, मी ‘हिंदू’ असा उल्लेख केला नाही. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.


भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -