घरदेश-विदेशमुख्याधापकच मुलींना दाखवत होता अश्लिल चित्रपट

मुख्याधापकच मुलींना दाखवत होता अश्लिल चित्रपट

Subscribe

मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यावर शैक्षणिक संस्कार व्हावेत आणि त्यांना चांगले वळण लागावे यासाठी यासाठी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. मात्र, जर विद्येच्या मंदिरात अशाप्रकारचे अश्लील प्रकार घडत असतील तर याहून दुसरी लांछनास्पद गोष्ट नाही. मध्यप्रदेशच्या एका शाळेत असा एक धक्कादायक प्रकार घडला आहे, की ज्यामुळे  यापुढे लोकं शिक्षण संस्थांकडेही संशयाने पाहतील. मध्य प्रदेशमधील सिहोर येथील एका प्राथमिक शाळेतील मुख्याधापक विद्यार्थिनींना मोबाईलवरुन पॉर्न चित्रपट दाखवत होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला असून, संशियत मुख्याधापक सध्या फरार आहे. सिहोर जिल्ह्यातील गोपालपूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी उमा मरावी यांनी सांगितल्यानुसार, पांडगावच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकच तिथल्या विद्यार्थिनींना अश्लिल चित्रपट दाखवत होता. या प्रकाराबद्दल त्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर संतप्त पालकांनी थेट शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना याबद्दल जाब विचारला. मात्र, त्यावेळी त्याने माफी मागत विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

तीच चूक पुन्हा केली…

आरोपी मुख्याध्यापकाने घडल्याप्रकरणी माफी मागितल्यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांनी या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्या मुख्याधापकाने काही दिवसांनी पुन्हा तीच चूक परत केली. पुन्हा एकदा त्याने शाळेतील विद्यार्थीनींनी त्यांच्या इच्छेविरुद्ध अश्लील चित्रपट दाखवला. या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि मुख्याध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सध्या ते फरार मुख्याध्यापकाचा शोध घेत आहे. आरोपीला लवकरात लवकर शोधून काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करु, अशी ग्वाही पोलिसांनी तक्रारकर्त्या पालकांना दिली आहे.


वाचा: ‘भविष्यात शेतकरीच करणार सत्तापालट’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -