घरदेश-विदेशशशी थरुर हाजिर हो!

शशी थरुर हाजिर हो!

Subscribe

'हिंदू पाकिस्तान' विधानावरुन शशी थरुर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

कॉंग्रेस नेते आणि तिरुवंतपुरमचे खासदार शशी थरुर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शुक्रवारी कोलकाताचे वकील सुमित चौधरी यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे कोलकाता न्यायालयाने त्यांना १४ ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. शशी थरुरवर देशाला बदनाम करत संविधानाचा अवमान केल्याचा आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागे शशी थरुर यांनी केलेले वादग्रस्त विधान कारणीभूत ठरले आहे. शशी थरुर यांनी ११ जुलैला एक वादग्रस्त विधान केले होते. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, ‘२०१९ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले तर देश ‘हिंदू पाकिस्तान’ बनेल’.

काय होते ते वादग्रस्त विधान

११ जुलैला शशी थरुर यांनी म्हटले होते की, ‘भाजप पुन्हा सत्तेवर आले तर एक नवे संविधान निर्माण करेल. या नव्या संविधानामुळे भारताला पाकिस्तान सारखा देश बनण्यासाठी मार्ग मोकळा होईल. या संविधानानुसार अल्पसंख्याकांची अवहेलना केली जाईल. त्यांना योग्य तो सन्मान दिला जाणार नाही’. त्यांनी असेही म्हटले होते की, ‘जर भाजप लोकसभा निवडणूक जिंकेल तर देशातील लोकशाही नष्ट होईल. कारण, त्यांच्याजवळ भारतीय संविधानाला नष्ट करण्याचा आणि नवीन संविधान लिहिण्याचे तत्त्वज्ञान आहे. नवे संविधान पुर्णपणे हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतावर अवंलंबून असेल, ज्यामध्ये अल्पसंख्यांकाचे अधिकार पुर्णपणे नष्ट करण्यात येतील’.

- Advertisement -

राहूल गांधींनी माफी मागावी – भाजप

थरुर यांच्या या विधानावर भाजपने पलटवार करत कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना या वादाग्रस्त विधानासाठी माफी मागण्यास सांगितले होते. भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी कॉंग्रेस भारताला अपमान करण्यासाठी आणि हिंदूंना बदनाम करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -