Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Go First Airlines: प्रवाशांना मोठा दिलासा; गो फर्स्टला प्रवाशांचे पैस परत करावे...

Go First Airlines: प्रवाशांना मोठा दिलासा; गो फर्स्टला प्रवाशांचे पैस परत करावे लागणार

Subscribe

DGCA ने विमान कंपनी Go First ला लवकरात लवकर प्रवाशांना परतावा देण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय विमान कंपनी GoFirst Airways ने मंगळवारी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात ऐच्छिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे.

GoFirst एअरलाइन्सला प्रवाशांचे संपूर्ण भाडे परत करावे लागणार आहे. GoFirst कडून मिळालेल्या प्रतिसादाची तपासणी केल्यानंतर DGCA ने हा आदेश जारी केला आहे. डीजीसीएने एका आदेशात म्हटले आहे की, सध्याच्या नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ( Cash- strapped go First Stops ticket Sales till May 15 DGCA orders full refunds  )

DGCA ने विमान कंपनी Go First ला लवकरात लवकर प्रवाशांना परतावा देण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय विमान कंपनी GoFirst Airways ने मंगळवारी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात ऐच्छिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. GoFirst Airways ने मंगळवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) कळवले होते की, 3 मे, 4 मे आणि 5 मे रोजी एअरलाइन्सची सर्व उड्डाणे रद्द राहणार आहेत.

GoFirst वर तिकीट बुक केलेल्या प्रवाशांचे काय होणार?

- Advertisement -

GoFirst ने म्हटले आहे की परतावा मूळ पेमेंट पद्धतीद्वारे केला जाईल. याचा अर्थ असा की जर एखाद्या प्रवाशाने ट्रॅव्हल एजंटद्वारे तिकीट बुक केले असेल तर ती रक्कम ट्रॅव्हल एजंटकडे परत जमा केली जाईल आणि प्रवाशाला ट्रॅव्हल एजंटकडून परतावा मागवावा लागेल. GoFirst सह थेट बुकिंगच्या बाबतीत, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

१५ मेपर्यंत तिकीटांची विक्री होणार नाही

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) कडे ऐच्छिक दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी, GoFirst ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला कळवले आहे की त्यांनी 15 मे पर्यंत तिकीट विक्री स्थगित केली आहे. विमान कंपनीने 9 मे पर्यंत उड्डाणे स्थगित केल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: पवारांचा राजीनामा : राहुल गांधी, स्ट‌‌‌‌‌ॅलिन यांचे सुप्रिया सुळेंना फोन; मनधरणीचा प्रयत्न? )

डीजीसीएने सांगितले की GoFirst च्या प्रतिसादाची तपासणी केली आहे आणि नियमांनुसार एक आदेश जारी केला आहे. गो फर्स्टला निर्धारित वेळेनुसार प्रवाशांना परतावा द्यावा लागणार आहे. एनसीएलटीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, एनसीएलटीने याचिका स्वीकारली नाही तर एअरलाइनने ट्रिब्युनलला स्थगितीच्या स्वरूपात अंतरिम दिलासा देण्यास सांगितले आहे.

- Advertisment -