मॉस्को : भारताच्या चांद्रयान-3 च्या आधी चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविण्याते आलेले रशियाचे लुना-25 हे अंतराळ यान क्रॅश झाले. आता लक्ष आहे ते भारताच्या चांद्रयान-3 कडे. पण रशियाचे लुना-25 हे चंद्राच्या पृष्ठभागावर कशामुळे कोसळले यामागील अनेक कारणे समोर येत असतानाच दुसरीकडे मात्र, आंतरराळ संशोधन संस्थेचे प्रमुख यांनी वेगळेच कारण सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या कारणांची सर्वत्र चर्चा होत आहे. (Cause of Luna-25 crash revealed Russia Says Forget What We Learned From Failure…)
रशियाच्या आंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख युरी बोरिसोव्ह हे म्हणाले की, इ.स.1960 आणि 1970 मध्ये आमच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या चुकांमधून ते जे काही शिकले होते त्यानंतरच्या या एवढ्या मोठ्या गॅपनंतर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ते विसरले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आधीच्या अनुभवाच्या जोरावर हे मिशन यशस्वी करता आले असते. परंतू तसे झाले नाही.
रशियाचे लुना-25 हे यान रविवारी चंद्रावर पोहचण्याआधीच कोसळले होते. मात्र, असे जरी असले तरी रशियाच्या आंतरराळ संशोधन संस्थेचे प्रमुख युरी बोरिसोव्ह हे अद्यापही खचले नसून, आपण चंद्रावर जाण्याची तयारी सुरूच ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : कांदा प्रश्नावर राज्य सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
मोहिम खूप वर्षानंतर राबविल्याचा परिणाम
लुना-25 ही रशियाची चंद्र मोहिम अपयशी झाल्यानंतरही आंतरराळ संशोधन संस्थेचे प्रमुख युरी बोरिसोव्ह हे चंद्रमोहिम राबविण्याची तयारी करीत आहेत.ते म्हणाले की, चंद्रमोहिम थांबविण्याचा निर्णय सर्वात घातक असा निर्णय राहणार आहे. तर लुना-25 या मोहिमेच्या अपयशानंतर बोरिसोव्ह म्हणाले की, चंद्रमोहिमेसाठी एवढ्या मोठ्या कालावधीनंतर आपल्या वैज्ञानिकांना तयार करणे म्हणजे मोठा प्रयत्न होता. तब्बल 50 वर्ष चंद्र मोहिम थांबविण्याचा परिणाम या चंद्रमोहिमेवर झाल्याचेही ते म्हणाले. 1960-70 मध्ये आमच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या चुकांमधून जे काही शिकले होते ते या 50 वर्षाच्या काळात ते विसरले. एकुणच तेव्हांची थेरी, तेव्हाची परिस्थिती ही या परिस्थितीच्या विपरीत आहे. त्यामुळेच ही मोहिम अयशस्वी झाली झाल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : शिवसैनिकाच्या हत्येतील आरोपीची जामिनावर सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, वाचा- काय आहे प्रकरण?
लुना ग्लोब असे दिले होते मिशनला नाव
11 ऑगस्टच्या सकाळी 4.40 वाजता रशियाने लूना-25 चे प्रक्षेपण केले होते. लुना-25 ला सोयुज 2.1 बी च्या रॉकेटमध्ये पाठविण्यात आले होते. याला लूना-ग्लोब असे नाव देण्यात आले होते. दरम्यान ते उतरण्याआधीच कोसळले. आता जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 या आंतराळ याना कडे असून, उद्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी महत्वाचा दिवस आहे. तर रशियाने याआधी 1976 मध्ये चंद्रावर लूना-24 हे यान उतरविले होते.