घरदेश-विदेशसिसोदीयांच्या विरोधात सीबीआयचा अजून एक गुन्हा; आता हेरगिरीचा ठपका

सिसोदीयांच्या विरोधात सीबीआयचा अजून एक गुन्हा; आता हेरगिरीचा ठपका

Subscribe

 

नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआयने अजून एक गुन्हा नोंदवला आहे. हेरगिरीचा ठपका सिसोदिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात सिसोदिया यांना Excise Policy मध्ये बदल केल्याच्या गुन्ह्यात सीबीआयनेच अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

- Advertisement -

सिसोदिया यांच्यासह सहा जणांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फीडबॅक युनिटच्या हेरगिरी प्रकरणात आप नेत्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने केली होती. सिसोदिया यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत खटला चालवण्यासही केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली होती. अखेर गुरुवारी सीबीआयने याचा गुन्हा नोंदवला.

दिल्लीत आपची सत्ता आल्यानंतर फीडबॅक युनिटची स्थापना करण्यात आली होती. १ फेब्रुवारी २०१६ रोजी कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन या युनिटने काम सुरु केले. गुप्तचर यंत्रणा व निमलष्करी दलाचे निवृत्त अधिकारी या युनिटमध्ये होते. विरोधी पक्ष, विविध मंत्रालये, व्यक्ति व संस्था यांची हेरगिरी करण्याचा या युनिटचा हेतू होता, असा आरोप आहे. याच प्रकरणात सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. मंत्री असताना Excise Policy मध्ये बदल करण्यासाठी सिसोदिया यांनी सचिवाला नवीन कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगितले होते. Excise Policy राबविण्यासाठी मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे सिसोदिया हे प्रमुख होते. नफ्याची टक्केवारी ५ टक्क्यावरून १२ टक्के करण्यात आली. त्याचा ठपका ठेवत सीबीआयने सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले. जोरदार शक्तिप्रदर्शन करत सिसोदिया हे चौकशीसाठी गेले. चौकशी केल्यानंतर सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली. अधिक चौकशीसाठी न्यायालयाने सिसोदिया यांना सीबीआय कोठडी सुनावली. त्यानंतर सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.  याप्रकरणाची ईडीकडूनही समांतर चौकशी सुरु आहे. ही चौकशी सुरु असतानाच सीबीआयने सिसोदिया यांना हेरगिरी प्रकरणात अटक केली आहे. याप्रकरणात आता नव्याने सीबीआय सिसोदिया यांची चौकशी करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -