घरताज्या घडामोडीमोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक

मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक

Subscribe

कथित मद्य परवाने वितरण प्रकरणी केजरीवाल सरकारचे मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांची आज सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. यावेळी सीबीआयने त्यांची तब्बल ८ तास चौकशी केली. मात्र, ८ तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (DCM Manish Sisodiya) यांची आज सीबीआय चौकशी करण्यात आली. ते सीबीआय कार्यालयात हजर राहिले. सीबीआय कार्यालयात जाण्याआधी ते आज राजघाट येथे गेले होते. त्यांच्यासोबत आपचे राज्यसभा खासदार संजय सिंगसुद्धा उपस्थित होते. कथित मद्य परवाने वितरण प्रकरणी चौकशीला सामोरे जाण्याआधी त्यांनी ट्वीट केलं होतं. त्यानुसार, मला अटक झाली तरी मी अटकेसाठी तयार आहे, असं ते म्हणाले होते.

मनीष सिसोदिया यांचं ट्वीट काय?

- Advertisement -

मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं की, “आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. सीबीआयच्या तपासकार्यात मी त्यांना मदत करणार आहे. लाखो विद्यार्थ्यांचं प्रेम आणि कोट्यवधी देशवासियांचे आशिर्वाद माझ्यासोबत आहे. काही महिने मला तुरुंगात राहावं लागलं तरी मला त्याची तमा नाही. भगतसिंग यांचा मी अनुयायी आहे. देशासाठी भगतसिंह फाशीवर चढले होते. अशा खोट्या आरोपांमुळे मला तुरुंगात जावं लागणं ही लहान बाब आहे.”


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -