घरक्रीडाआयपीएलमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग, सीबीआयने तीन जणांना केली अटक

आयपीएलमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग, सीबीआयने तीन जणांना केली अटक

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे हे प्रकरण २०१९मधील आहे. सीबीआयने याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

या मॅच फिक्सिंग करणार्‍यांचे पाकिस्तानशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. या लोकांना आयपीएल मॅचेस फिक्स करण्यासाठी पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचे उघडकीस आल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

सीबीआयने जयपूर, दिल्ली आणि जोधपूरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. २०१९च्या वेळी हे लोक आयपीएलमध्ये फिक्सिंग करीत होते आणि त्यांचा थेट संबंध पाकिस्तानशीही होता, अशी माहिती समोर आली आहे.

जगातील सर्वांत मोठी आयपीएल स्पर्धा मॅच फिक्सिंगच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असते. आता आयपीएल सीझन  १५च्या मध्यावर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएलमध्ये अनेक वेळा खेळाडू आणि संघांवर फिक्सिंगसाठी बंदी घालण्यात आली आहे. याआधीही २०१३मध्ये आयपीएलवर फिक्सिंगचा काळा डाग पडला होता. त्यानंतर बीसीसीआयने एकाच वेळी तीन खेळाडूंवर बंदी घातली होती. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना आयपीएल सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

त्यांच्यासोबतच विंदू दारा सिंग आणि मयप्पन यांच्यावर स्पॉट फिक्सिंगसाठी बुकींशी संपर्क साधल्याचा आरोप होता. त्यानंतर दोघांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. नंतर अंकित आणि अजित यांच्यावर आजीवन क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली, पण सात वर्षांनंतर श्रीशांतची बंदीतून सुटका झाली, मात्र या खेळाडूने नंतर निवृत्ती घेतली. त्यावेळी तपास होईपर्यंत राजस्थान रॉयल्स संघाला निलंबित करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -