घरदेश-विदेशSBI सह आठ बँकांना ४३०० कोटींचा गंडा; आरोपींविरोधात CBI ने दाखल केला...

SBI सह आठ बँकांना ४३०० कोटींचा गंडा; आरोपींविरोधात CBI ने दाखल केला गुन्हा

Subscribe

हैदराबादमधील एका कंपनीने SBI सह आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. साबीआयने आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आयव्हीआरएसएल ही हैदराबादमधील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी गेली २५ वर्षापासून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण, ऑपरेशन्स आणि देखभाल आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये काम करत आहे. यी कंपनीने अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली आहे. SBI च्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. सीबीआयने तक्रारीमध्ये आरोप केला आहे की, आरोपींनी अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली आहे. आठ बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या सर्व बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक झाली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी माहिती देताना सांगितलं की, आरोपांनुसार कर्जदार कंपनीच्या संचालकांनी SBIच्या नेतृत्वातील बँकांकडून क्रे़डिट लिमिटचा लाभ घेतला आणि कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली.” तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने लेटर ऑफ क्रेडिट्सच्या (LCs) माध्यमातून संबंधित लोकांना पैसे दिले. यावेळी त्यांनी खरेदी व्यवहारांची नोंद न करता कंपनीच्या खात्यात हा निधी जमा केला आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला. सीबीआयकडून बुधवारी यासंबंधी आरोपींच्या कार्यालयं आणि घरांवर टाकून काही कागदपत्रं जप्त केली आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -