दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या अहवालातून मोठी माहिती उघड

Disha Salian was raped
दिशा सालियन

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने (CBI Report) केलेल्या चौकशीत तिचा मृत्यू अपघात असल्याचं सिद्ध झालं आहे. दिशा सॅलिअन ८ जून २०२० रोजी मालाडमधील गॅलेक्स रीजेंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडली होती. हा अपघात झाल्यानंतर पाचव्याच दिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू (Sushant Singh Rajput Death Case) झाला. त्यामुळे भाजपा नेते नितेश राणे (BJP Leader Nitesh Rane) यांनी या दोन्ही प्रकरणांचा एकच संबंध जोडला होता.

इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दिशाने तिच्या वाढदिवसानिमित्त गेट टुगेदरचं आयोजन केलं होतं. यावेळी तिने रात्री मद्यप्राशन केलं होतं. त्यामुळे दारूच्या नशेत दिशाचा तोल गेला आणि फ्लॅटच्या पॅरोपेटवरून ती घसरली. यामुळे तिचा मृत्यू झाला, असं सीबीआयच्या अहवालातून समोर आला आहे. सुशांतसिह राजपूत मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू असताना ही माहिती समोर आली आहे.

दिशाचा मृत्यू झाल्यानंतर, पाच दिवसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही मृत्यूप्रकरणी एकमेकांशी संबंध जोडण्यात आला आहे. या प्रकरणात राजकारण शिरल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यामुळे दिशा सालिअनचीही हत्या झाल्याची असल्याचा आरोप नितेश राणेंकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता हा महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.