Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अनिल देशमुखांचा ज्ञानेश्वरी बंगला, नागपुरच्या घरासह ४ ठिकाणी CBIचे छापे

अनिल देशमुखांचा ज्ञानेश्वरी बंगला, नागपुरच्या घरासह ४ ठिकाणी CBIचे छापे

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून बैठकांचे सत्र सुरू

Related Story

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सीबीआय चौकशीनंतर आज शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. या संपुर्ण प्रकरणात आता सीबीआयची टीम सक्रीय झाली असून मुंबई, नागपूरसह विविध ठिकाणी सीबीआयच्या टीमने छापे टाकले आहेत. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांविरोधात आता सीबीआयच्या टीममार्फत छापे टाकण्याचे सत्र सुरू झाले. अनिल देशमुख यांच्या मुंबईतल्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी तसेच नागपुरातल्या घरातही छापेमारीसाठी सीबीआयची टीम पोहचली आहे.

तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडूनही सीबीआयच्या गुन्हा दाखल करण्याच्या संपुर्ण प्रकणात बैठकांचा सपाटा लावण्यात आल्याचे कळते. अॅडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेवर आदेश देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने दिले होते. तसेच १५ दिवसात अहवाल सादर करावा असेही हायकोर्टाने सीबीआयला स्पष्ट केले होते. त्यानुसार २० एप्रिलला हायकोर्टाने दिलेली मुदत संपलेली आहे. सीबीआयने या संपुर्ण प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच अहवाल तयार केला आहे. या प्रकरणातील चौकशी शुक्रवारी संपल्यानंतरच सीबीआयची टीम या संपुर्ण प्रकरणात सक्रीय झाली असून अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने दिल्लीत एफआयआर दाखल केला आहे. खंडणी वसूल करणे तसेच भ्रष्टाचार केल्या प्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईतल्या तसेच नागपुरच्या निवासस्थानी सीबीआयची टीम दाखल झाली असून त्यांनी काही कागदपत्रे तसेच महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याचे कळते. तसेच अनिल देशमुखांचा लॅपटॉपही ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर याआधी १४ एप्रिलला चौकशी झाली होती. मुंबईत डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयच्या १२ जणांच्या टीमने अनिल देशमुख यांची कसुन चौकशी केली. जवळपास ७५ प्रश्न अनिल देशमुख यांना विचारण्यात आले होते. त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या १०० कोटींच्या आरोपांवरही सीबीआयच्या टीमने अनिल देशमुख यांना प्रश्न विचारले होते. अनेक आरोप हे अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले होते असे कळते. तसेच आपली आणि सरकारची बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात आल्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी केला होता. त्याआधी एका मुलाखतीत अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांचा लेटर बॉम्ब हा त्यांच्या बदलीमुळे ते दुखावल्याने लिहिण्यात आल्याचे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले होते.


 

- Advertisement -