सीबीआयची एकाच वेळी १९ राज्यांमध्ये ११० ठिकाणी छापेमारी

सीबीआयने मंगळवारी देशभरात एकूण ११० ठिकाणी छापे टाकले आहेत.

CBI conducting searches at around 110 places across
सीबीआयची एकाच वेळी १९ राज्यांमध्ये ११० ठिकाणी छापेमारी

केंद्रिय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी एकाचवेळी ११० ठिकाणी छापे टाकले आहेत. ही छापेमारी एकूण १९ राज्यांमध्ये टाकण्यात आली आहे. सीबीआयला शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीची खबर लागली होती. देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने एका विशेष अभियानाअंतर्गत १९ राज्यांमध्ये छापेमारी टाकली. सीबीआयला या कामगिरीत आतापर्यंत कितपत यश आले आहे, याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र, या प्रकरणी सीबीआयने ३० गुन्हे दाखल केले आहेत.