घरताज्या घडामोडीबाल लैंगिक शोषण प्रकरणात CBIची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये छापेमारी

बाल लैंगिक शोषण प्रकरणात CBIची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये छापेमारी

Subscribe

ऑनलाईन बाल लैंगिक शोषण प्रकरणात सीबीआयने देशभरातील १४ राज्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान ७६ ठिकाणी शोध कार्य करण्यात आले. याप्रकरणात १४ नोव्हेंबरला ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळ्या टिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तमिलनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सीबीआयने कारवाई केली आहे.

बाल लैंगिक शोषण थांबविण्यासाठी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्याक्रमांतर्गत १४ ते २० नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बाल सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बाल लैंगिक शोषण विरोधात जागरुकता मोहीम चालवली जाईल. यासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राष्ट्रीय आरोग्य अभियान उत्तर प्रदेशच्या किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. वेद प्रकाश यांनी राज्यातील सर्व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.

- Advertisement -

जगभरात इंटरनेटवर वाढणारे बाल लैंगिक शोषण एक जागतिक समस्या बनत आहे. या समस्येमुळे खेळणारे, उड्या मारणारे बालपण हळूहळू नष्ट होताना दिसत आहे. भारतात लहान मुलांवरील गुन्हांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशाच गुन्ह्यांना रोखण्यासाठी सीबीआयने दोन वर्षांपूर्वी एका पथकाची स्थापना केली होती. जे देशभरात लहान मुलांवर होणाऱ्या ऑनलाईन लैंगिक शोषण थांबवेल. गेल्या काही वर्षांमध्ये देशात बाल लैंगिक शोषणासंदर्भात एका पाठोपाठ एक अशा भीषण घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे आता सीबीआय याला आळा घालण्यासाठी सक्रिय झाली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार २०१६मध्ये जारी करण्यात आलेल्या अहवालात पाहिले तर २०१४ मध्ये मुलांविरोधात ८९,४२३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर २०१५ मध्ये ९४,१७२ आणि २०१६ मध्ये १,०६,९५८ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा – सिगारेट न दिल्याने टोळक्याची मारहाण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -