Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी CBI च्या अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी, नवे संचालक ॲक्शन...

CBI च्या अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी, नवे संचालक ॲक्शन मोडमध्ये

महिला कर्मचाऱ्यांना देखील फक्त साडी आणि फॉर्मल शर्ट वापरणे बंधनकारक

Related Story

- Advertisement -

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी ड्यूटीवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेहराव/गणवेशाबाबत नवीन नियमावली तयार केली आहे. यामुळे आता सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर उपस्थित असताना, कार्यालयात येताना जीन्स,टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील फक्त साडी आणि फॉर्मल शर्ट वापरणे बंधनकारक केलं आहे. सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फॉर्मल कपडे परिधान करुनच कार्यालयात यावे असे आदेश सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत.

सुबोधकुमार जयस्वाल यांनी सीबीआय संचालक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे. सीबीआय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल करुन घेतले आहेत. सहाय्यक संचालक अनूप टी मॅथ्यू यांनी सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मंजुरीनंतर परिपत्रक जारी केले आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांनी नियमावलीत बदल केल्यानंतर आता सीबीआय कार्यालयात येताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज या गणवेशातच येणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता जीन्स, टी-शर्ट,स्पोर्टस शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच पुरुष अधिकाऱ्यांना आपली दाढी वाढवता येणार नाही.

- Advertisement -

सीबीआय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्याही पेहरावात बदल करण्यात आला आहे. महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी यांना कार्यालयात येताना साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयचे नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल येत्या काळात अनेक नियमांत बदल करणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी

मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जयस्वाल यांनी याआधी जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे. जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार, सीबीआयचे नवे प्रमुख म्हणून सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली होती.

- Advertisement -