घरदेश-विदेशCBI ने स्वतःच्याच मुख्यालयात टाकले छापे

CBI ने स्वतःच्याच मुख्यालयात टाकले छापे

Subscribe

सीबीआयने तीन दिवसांत त्यांच्याच मुख्यालयावर दुसऱ्यांदा छापा मारला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय मुख्यालयातील १० वा आणि ११ वा मजला सील करण्यात आला आहे.

सीबीआयने आज, बुधवारी तीन दिवसांत त्यांच्याच मुख्यालयावर दुसऱ्यांदा छापा मारला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय मुख्यालयातील १० वा आणि ११ वा मजला सील करण्यात आला आहे. आज पहाटेपासूनच या दोन्ही मजल्यांवरील कार्यालयांची झाडाझडती सुरू आहे. सध्या सीबीआयच्या अंतर्गत वादाची चर्चा देशभर सुरु असताना सलग तीन दिवस सीबीआयची कारवाई सुरु आहे. सीबीआयचे दोन वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचार प्रकरणात अडकल्यानंतर आज केंद्राने सहसंचालक एम. नागेश्वर राव यांची सीबीआयच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती केली. लाच घेतल्या प्रकरणी चौकशी सुरु असेपर्यंत सीबीआयप्रमुख आलोक वर्मा आणि दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी स्पेशल डायरेक्ट राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

वाचा : CBI खंडणी वाद : संचालक सक्तीच्या रजेवर

स्वतःच्याच कार्यालयावर पहिल्यांदा छापेमारी

सीबीआयने स्वतःच्याच कार्यालयावर छापे मारण्याची ही पहिलीच घटना आहे. सोमवारी देखील मुख्यालयात सीबीआयने छापेमारी केली होती. अस्थाना आणि त्यांच्या टीमच्या एका डीएसपीवर मांस उद्योजक मोइन कुरेशीशी संबंधीत मनी लाँडरींग प्रकरणीत तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -