CBI Raid : लालू प्रसाद यादव यांच्या घरासह 17 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी, तपास मोहीम अद्याप सुरूच

CBI Raids Underway At 17 Locations Linked To Lalu Prasad, Daughter In New ‘Land For Railway Job’ Scam
CBI Raid : लालू प्रसाद यादव यांच्या घरासह 17 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी, तपास मोहीम अद्याप सुरुचं

केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित दिल्ली आणि बिहारमधील 17 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. दरम्यान यात राबडी देवी यांच्या पाटणातील शासकीय निवासस्थानावर देखील सीबीआयने छापा टाकला आहे. गेल्या दोन तासांपूर्वी ही छापेमारी सुरु झाली. पाटणासोबतचं सीबीआयने दिल्ली आणि इतर शहरांमध्येही एकाच वेळी 17 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. हे संपूर्ण प्रकरण लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत झालेल्या घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आता सीबीआय अधिकारी राबडी देवी यांचीही चौकशी करत आहेत.

सीबीआय अधिकारी खताळ यांचीही चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात लालू यादव यांनी लोकांकडून जमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. खताळ यांच्या जमिनीबाबतही तेच बोलले जात आहे. लालू यादव – राबडी देवी यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव पाटणात नसताना ही छापेमारी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तो लंडनला रवाना झाला होता. खुद्द लालू यादव सध्या त्यांची मोठी मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आहेत. पाटणा व्यतिरिक्त बिहारच्या गोपालगंज, दिल्ली आणि भोपाळमध्येही ही छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटणा येथील 10, सर्कुलर रोड येथील निवासस्थानावर सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहेत. सकाळी सीबीआयचे अधिकारी येथे पोहोचले तेव्हा घरातील लोकांना नीट जागही येत नव्हती. सीबीआय अधिकाऱ्यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी प्रवेश करताच दरवाजे बंद केले. यानंतर आतून बाहेरून कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला. छापा सुरू झाल्यानंतर सुमारे एक तासाने सीबीआयचे अधिकारी राबडी देवी यांच्या घरी पोहोचले. झारखंड क्रमांकाच्या वाहनासह सीबीआय अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी किमान तीन वाहने राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर उभी करण्यात आली आहेत. त्यानंतरही काही अधिकारी येथे येत राहिले.

राबडी देवी यांच्या निवासस्थानावर छापेमारीची बातमी समजताच लालू समर्थक आणि आरजेडीचे नेते आणि आमदार तेथे येऊ लागले. येथील वाढती गर्दी पाहता बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. घराच्या आत आणि बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लालू यादव यांचे दोन वकीलही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले तेज प्रताप यादव यांचे समर्थक कारवाई थांबवा अशा घोषणा देत आहेत.

लालू यादव पाच वर्षे रेल्वेमंत्री होते

लालू यादव 2004 ते 2009 या काळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. यादरम्यान त्यांच्यावर विविध घोटाळे केल्याचा आरोप करण्यात आला. सीबीआय या प्रकरणांचा तपास करत आहे. या प्रकरणांमध्ये यापूर्वीही छापे टाकण्यात आले आहेत.


Omicron Sub Variant : भारतात आढळला BA.4 चा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा व्हेरिएंट?