घरताज्या घडामोडीमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात CBI मार्फत गुन्हा दाखल, मुंबईत छापे

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात CBI मार्फत गुन्हा दाखल, मुंबईत छापे

Subscribe

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) मार्फत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच सीबीआयच्या टीमने अनेक ठिकाणी धाडसत्रही सुरू केल्याची माहिती आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर झाल्यानंतरच सीबीआयमार्फत ्निल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या दिल्लीतील पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या टीमने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सलग ९ तास चौकशी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या माझी मंत्र्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे या संपुर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा सेटबॕक असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. सीबीआयच्या टीमने अनेक ठिकाणी धाडसत्रही सुरू केल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडणार आहे.

 

याआधी अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठीचा समन्स सीबीआयच्या टीमने माजी गृहमंत्र्यांना पाठवला होता. त्यानुसार सीबीआयच्या १२ जणांच्या टीमकडून अनिल देशमुख यांची तब्बल ९ तास चौकशी झाली. त्या चौकशीत अनिल देशमुख यांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले पैसे वसुलीचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच आपली आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी चौकशीत म्हटले होते. अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेला मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून महिन्याला १०० कोटी रूपये वसुल करण्याचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानेच या संपुर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी मुंबईतल्या पेशाने वकील असलेल्या अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी केली होती. त्यानुसारच अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. याआधी १४ एप्रिलला दिवसभर चाललेल्या चौकशीत परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बच्या मुद्द्यावर सीबीआयने अनिल देशमुख यांना एकुण ७५ प्रश्न या चौकशी दरम्यान विचारले असल्याची माहिती आहे. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासोबतचे संबंध याबाबतची चौकशीही अनिल देशमुख यांच्या बाबतीत झाली. तर एसीपी संजय पाटील यांना पाठवलेल्या वॉट्स एप मॅसेजबाबतची चौकशीही सीबीआयच्या टीमकडून करण्यात आली.

- Advertisement -

सीबीआय़च्या टीमने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईथ अनेक ठिकाणी छापे टाकायलाही सुरूवात केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमुळे अनिल देशमुख यांच्या संकटात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. सीबीआयने या संपुर्ण प्रकरणात सचिन वाझे आणि परबीर सिंह यांच्या चौकशीसाठीही नॅशनल एनवेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) कोर्टाकडे वेळ मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी चौकशी होणार असल्याचे कळतेत

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -