Hathras Case : सीबीआय करणार हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी

NCP protest at Ghatkopar
हाथरस येथे घडलेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार विरोधात आज घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली. (फोटो - दीपक साळवी)

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणी आता सीबीआयमार्फत चौकशी केली जाणार आहे. हाथरस येथे एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. काही दिवसांनी त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली जात होती. अखेर हे प्रकरण आता केंद्रीय तपास पथकाने (सीबीआय) हाती घेतले आहे.

योगी सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत शिफारस केली होती. या प्रकरणात पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे न सोपवता तो पोलिसांनी स्वतः मध्यरात्री ३ वाजता जाळून टाकला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. अद्यापही ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकार आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. हा तपास सुरु असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येईल, अशी घोषणाही केली होती.

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर अमानुषपणे सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्या पीडितेने आपला जीव गमावला असून तिला न्यान मिळाना यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून आवाज बुलंद केला जात आहे. त्या पीडितेचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून रातोरात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिखळले असून लोक भावनांचा आता उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

सहा वर्षानंतर देवेन भारती साईड पोस्टिंगला; जयजित सिंग एटीएस प्रमुख