घरदेश-विदेशCBSE 10th Result 2021: सीबीएसई १० वीचा निकाल जाहीर, 'या' ३ डायरेक्ट...

CBSE 10th Result 2021: सीबीएसई १० वीचा निकाल जाहीर, ‘या’ ३ डायरेक्ट लिंकवरुन पाहा निकाल

Subscribe

LIVE CBSE Board Class 10th Result 2021 Updates: सीबीएसई बोर्डाच्या १० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. गेली अनेक दिवस विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १२ वाजता  निकालाची घोषणा केली. यंदाचा सीबीएसई १० वीचा निकाल सर्वोत्तम निकालांपैकी असल्य़ाचे घोषित करण्यात आले आहे. कारण या परीक्षेत यंदा सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदा सीबीएसईच्या इयत्ता १० वीत ९९.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर फक्त ०.०६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

देशभरातून २० लाखहून अधिक विद्यार्थी सीबीएसई १० वीच्या परीक्षेत सहभागी झाले होते. मात्र या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालावर नापास शब्दाऐवजी “Essential Repeat” चा वापर केला आहे. त्यामुळे निकालावर नापास असा थेट उल्लेख आता नसणार आहे.

- Advertisement -

या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी ३ डायरेक्ट लिंक देण्यात आल्या आहेत. या डायटेक्ट लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल पाहणे सोईचे होत आहे. यासाठी सीबीएसई बोर्डाने १० वीच्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in ही अधिकृत वेबसाईट जाहीर केली आहे. मात्र हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबरची आवश्यकता आहे.

सीबीएसई १० वीचा निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक १

- Advertisement -

सीबीएसई १० वीचा निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक २

सीबीएसई १० वीचा निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक ३

cbseresults.nic.in या वेबसाईटवर १० वीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास अडचणी येत असल्यास सीबीएसई रिजल्ट पोर्टलचे पेज रिफ्रेश करत रहा. कारण एकाच वेळी अनेक विद्यार्थी निकाल पाहत असल्याने वेबसाईट हँग होत आहे. यात सीबीएसई २०२१ चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोल नंबर भरण्याआधी तो क्रॉस चेक करणे गरजेचे आहे.

या स्टेप फॉलो करुन पहा निकाल

१) सीबीएसई १० वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in वेबसाईटवर जा.

२) यानंतर CBSE Result 2021 वर क्लिक करा.

३) आपल्यासमोर ही लिंक अॅक्टिव्ह होताच नवीन विंडो ओपन होईल.

४) यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरुन कॅप्चा कोड सबमिट करा.

५) आता निकाल पाहण्यासाठी सबमिटवर क्लिक करा.

६) आपल्यासमोर आता निकालाची अंतिम प्रत ओपन होईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -