घरदेश-विदेशसीबीएसई दहावीचा निकाल जाहीर

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर

Subscribe

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड १० वीचा निकाल ८६.७० टक्के लागला आहे. यावर्षी एकूण १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आज दुपारी २ वाजता सीबीएसईच्या वेबसाइटवर निकाल जाहीर झाला.

मुली ठरल्या सरस
निकालात ८८.६७ टक्क्यांसोबत मुलींनी बाजी मारली असून मुलांची टक्केवारी ८५.३२ आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का मुलांपेक्षा ३.३५ टक्के जास्त आहे. सीबीएसई दहावी बोर्ड परिक्षेसाठी १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थी बसले होते. यामधील १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण टक्का ८६.७० आहे.

- Advertisement -

‘टॉप थ्री’ क्षेत्रांची टक्केवारी
क्षेत्रानुसार तिरुअनंतपुरम, चेन्नई आणि अजमेर पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तिरुअनंतपुरम ९९.६० टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर असून, महाराष्ट्राचा समावेश असणारा चेन्नई ९७.३७ टक्क्यासह दुसऱ्या आणि अजमेर ९१.८६ टक्क्यांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

‘हे’ चौघेही प्रथम स्थानावर (५०० पैकी)
प्रकाश मित्तल (४९९ मार्क्स) – डीपीएस गुडगाव शाळा
रिमझिम अग्रवाल (४९९ मार्क्स) – आर पी पब्लिक स्कूल, बिजनोर
नंदिनी गार्ग (४९९ मार्क्स) – स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल, शामली
श्रीलक्ष्मी (४९९ मार्क्स) – भवन्स विद्यालय, कोचिन

- Advertisement -

मुंबईतील टॉपर्स

  • तरुण अग्रवाल – ९८.६० टक्के
तरुण अग्रवाल
  • तन्मय गर्ग – ९८. ४० टक्के
तन्मय गर्ग

दोघेही सांताक्रूझमधील आर. एन. पोद्दार शाळेचे विद्यार्थी आहेत 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -