घरदेश-विदेश१२ वी सीबीएसई बोर्डाचा निकाल ९९.३७ टक्के

१२ वी सीबीएसई बोर्डाचा निकाल ९९.३७ टक्के

Subscribe

सीबीएसईच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायएस्ट पासिंग परसेंट आहे. तर, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. परीक्षेत परत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 0.54% ने जास्त आहे. यंदाच्या परीक्षेत 99.67 मुली तर 99.13 टक्के मुले पास झाली आहेत. सलग सहाव्या वर्षी मुलींनी बाजी मारलेली आहे.

बोर्डाने ठरवलेल्या नियमांनुसार, यंदाचा 12वीचा निकाल 30:30:40 फॉर्म्युलानुसार लावण्यात आला आहे. यात 10वी आणि 11वीतील 5 पैकी 3 सर्वाधिक गुण असलेल्या विषयांना ग्राह्य धरले आहे. तर, 12वीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या आधारे टक्केवारी काढण्यात आली आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांकडून अभिनंदन

या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा… असे मोदींनी म्हटले आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठे ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेले भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा ऊर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा… अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -