घरदेश-विदेशCBSE Board : दहावी- बारावीच्या निकालात मुलींची बाजी

CBSE Board : दहावी- बारावीच्या निकालात मुलींची बाजी

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी बोर्डाचा निकाल आज (12 मे) जाहीर केला आहे. सीबीएसईच्या http://cbse.gov.in किंवा http://results.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षात दहावीमध्ये निकाल 93.12, तर बारावीचा निकाल ८७.३३ टक्के लागला आहे.

बारावीच्या सीबीएसई निकालानंतर बोर्डाने दहावीचा निकालही जाहीर केला आहे. दहावीच्या बोर्डाची परीक्षेत दिल्लीतील एकूण 338084 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यामध्ये 295340 मुले उत्तीर्ण झाली आहेत. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.31 ट्कके आहे आणि मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 90 टक्के आहे. उत्तीर्ण होण्याच्या एकूण टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर ते 88.58 टक्के आहे. जे विद्यार्थी यावर्षी CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत बसले आहेत ते CBSE च्या अधिकृत वेबसाइट http://cbse.gov.in वर बोर्डाचा निकाल पाहू शकतात. CBSE इयत्ता 10 ची गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना CBSE निकालाच्या लिंकवर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि ऍडमिट कार्ड आयडीचा वापर करावा लागणार आहे. सीबीएसई 10वीच्या परीक्षेत एकूण 76 विषयांवर परीक्षा पार पडली होती.

- Advertisement -

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी बोर्डाने 12वीचा निकाल जाहीर केला होता. 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत पार पडली होती. या परीक्षेला एकूण 16,60,511 विद्यार्थी बसले होते. यापैकी 14,50,174 विद्यार्थी यशस्वीरित्या पास झाले आहेत.

पंतप्रधनांनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
CBSE 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विद्यार्थ्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरमध्ये म्हटले की, ‘जे विद्यार्थी विचार करत आहेत की, ते 12वी मध्ये चांगले प्रदर्शन करू शकले असते, मी त्या होतकरू तरुणांना सांगू इच्छितो की, तुम्हाला येणाऱ्या काळात आणखी खूप काही करण्याची संधी आहे. एक परीक्षा तुमची व्याख्या ठरवू शकत नाही. तुम्हाला ज्या क्षेत्रात रस आहे, त्या क्षेत्रात तुमची प्रतिभा पणाला लावा. यामुळे तुमची खूप प्रगती होईल. याचवेळी त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, CBSE परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे अभिनंदन. त्यांच्या आगामी प्रयत्नांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांची शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल होवो आणि वर्गाच्या पलीकडे त्यांच्या इतर आवडींचा पाठपुरावा करा.

- Advertisement -


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -