सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; असा पाहा निकाल

cbse board class 12 result 2022 declared

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेत 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत 14,35,366 विद्यार्थी बसले होते. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 94.54 टक्के आहे, तर 91.25 मुलं उत्तीर्ण झाली आहेत. सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी पोर्टवर तीन लिंक अॅटिव्ह केल्या आहेत. यंदाच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी संख्या 134797 (9.39 टक्के) आहे. तर 95 टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी संख्या 33432 (2.33 टक्के) इतकी आहे.

सीबीएसईच्या टर्म 1 आणि टर्म 2 मध्ये घेतलेल्या बोर्डाच्या परीक्षेत या वर्षी बसलेले विद्यार्थी cbseresults.nic.in लिंकवरून निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांना आपला निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी रिजल्ट पेजवर आपला रोल नंबर, स्कूल नंबर आणि अॅडमिट कार्ड आयडी नंबर टाकून सबमिट करावा लागेल.

CBSE 12वी निकाल 2022 लिंक – 1

CBSE 12वी निकाल 2022 लिंक – 2

सीबीएसई 12वी निकाल 2022 लिंक – 3

CBSE बोर्ड 12वी मध्ये 92.71 टक्के उत्तीर्ण

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, यंदा सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेत 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी 99.37 टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले होते. मात् गेल्या वर्षी पर्यायी मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. त्याच वेळी 2020 मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 88.78 टक्के होती आणि 2019 मध्ये 83.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मोबाईवरून डाऊनलोड करा रिझल्ट

१) सीबीएसई बोर्डाची इयत्ता 12 वीची मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी डिजीलॉकर पेज digilocker.gov.in वर जाऊन मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

२) यासाठी विद्यार्थ्यांना आपला आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शाळेकडून देण्यात आलेला पिननंबर सबमिट करावा लागेल.

३) यानंतर विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या निकालासह आपली मार्कशीट कम सर्टिफिकेटची डिजिटल कॉपी डाऊनलोड करू शकतात.

४) हे सर्टिफिकेट विद्यार्थी कोणत्याही अॅडमिशन किंवा जॉबसाठी वापरू शकतात.


जेईई मेन 2022 चं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाऊनलोड