Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश CBSE Board Exam 2021: सीबीएसईच्या कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा तूर्तास रद्द

CBSE Board Exam 2021: सीबीएसईच्या कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा तूर्तास रद्द

Related Story

- Advertisement -

देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा तुर्तास रद्द करण्यात आली आहे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही.

सीबीएसईच्या निर्णयानुसार, ज्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल अशा विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा (CBSE Practical Exam Date )पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्याला घरीच सेल्फ आयसोलेशनचा सल्ला दिला जाईल. त्यामुळे लेखी परीक्षा संपल्यानंतर या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. ४ मेपासून सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत.

- Advertisement -

यातच सीबीएसई बोर्डाच्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा मिळाला आहे. नुकतेच सीबीएसईने आपल्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांचे परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार, जर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा कोरोनामुळे आपल्या घरापासून दूर राहत असेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्याने सीबीएसई बोर्डाला ऑनलाईन पत्र पाठवण्याची गरज आहे. परंतु यावर अंतिम निर्णय सीबीएसई बोर्डाचा असणार आहे.


हेही वाचा- Income Tax : १ एप्रिलपासून आयकर विभागाच्या बदलत्या नियमांचा सर्वसामान्यांवर काय परिणाम ?


- Advertisement -

 

- Advertisement -