घरदेश-विदेशCBSE Board Exams 2021: 12 वीच्या परीक्षा पुढे ढलकल्याने JEE आणि NEET...

CBSE Board Exams 2021: 12 वीच्या परीक्षा पुढे ढलकल्याने JEE आणि NEET परीक्षांना फटका

Subscribe

देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकराने घेतला आहे. याचा फटका आता इंजिनियरिंग आणि मेडिकल कॉलेजच्या प्रवेश परीक्षांना बसणार आहे. केंद्र सरकार 1 जून 2021 रोजी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षांचा तारखा जाहीर करणार आहे. यामुळे यंदाच्या आयआयटी प्रवेशासाठीची जेईई पूर्व परीक्षा(JEE), आणि मेडिकल प्रवेशासाठीची (National Eligibility cum Entrance Test) नीट (NEET) परीक्षाही आणखी पुढे जाऊ शकतात अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. कोरोनामुळे २०२० प्रमाणे यंदाही जेईई आणि नीट परीक्षांचा गोंधळ उडाला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परिणामी जेईई मुख्य परीक्षा(JEE Main Exam) जेईई पूर्व परीक्षा (JEE Advanced Exam) सप्टेंबरमध्ये घेण्यात आल्या. त्यामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक सत्राची सुरुवात उशीरा झाल्याने याचा परिणाम या वर्षीच्या परीक्षांवर आधीच झाला आहे. दरवर्षी जेईई मुख्य परीक्षा(JEE Main Exam)ही मेपासून ते ३ जुलैदरम्यान होते. तर नीट(NEET) परीक्षा १ ऑगस्ट दरम्यान होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे जेईई आणि नीट परीक्षांचा गोंधळ उडाला आहे. दरम्यान केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या(CBSE Board) दहावीच्या परीक्षा एक महिन्यापेक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व प्रवेश परीक्षाही पुढे ढकलल्या जातील, ज्यामुळे यावर्षीदेखील शैक्षणिक सत्र उशीराने सुरु होणार अशी विद्यार्थ्यांच्या पालकांना भीती आहे.

- Advertisement -

देशात वाढत्या कोरोनामुळे २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यादरम्यान राज्यातील बोर्डाच्या परीक्षा संपत आल्या होत्या तर सीबीएसई बोर्डाचे काही पेपरचं राहिले होते. त्यामुळे २०२० हे शैक्षणिक वर्ष गोंधळात गेले. तर यंदाही सीबीएससी परीक्षांबाबत गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे परीक्षा कधी होतील आणि त्यांचा निकाल केव्हा जाहीर होईल याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान सीबीएससी बोर्डाला परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांची नोटीस जाहीर करावी लागेल. परंतु जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यातही परीक्षा सुरु झाल्या तरी जेईई (JEE Advanced) आणि NEET परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता आहे असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

जरी परीक्षा वेळेवर झाल्या तरी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर होण्यास उशीर होईल. विद्यार्थ्यांनी मेडिकलमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीच्या बोर्ड स्कोरची आवश्यकता असते. त्यामुळे काही पालक सीबीएससी बोर्ड परीक्षा दोनदा घेण्यात याव्या असे मत व्यक्त करत आहेत. कारण ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा परीक्षा देता आली नाही असे विद्यार्थी दुसऱ्या सत्रात तरी परीक्षा देऊ शकतात. असे मत पालक व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

आयआयटीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, कोरोनाची सध्याची परिस्थिती अंदाजिक आहे. गेल्या तीन आठवड्य़ात कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली, त्यामुळे जूनमध्ये काय परिस्थिती असेल सांगता येत नाही. परीक्षांबाबत निर्णय घेण्याआधी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. तसेच जूनमध्ये सीबीएसईच्या बारावी बोर्डच्या परीक्षा जाहीर झाल्यास आणि सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे जुलैमध्ये जेईईच्या परीक्षा झाल्यासविद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -