घरताज्या घडामोडीसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

Subscribe

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सोमवारी बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, ९२.१५ टक्के विद्यार्थींनी उतीर्ण झाल्या आहेत. तर ८६.१९ मुले उतीर्ण झाले आहेत. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा निकाल ६६.६७ टक्के इतका लागला आहे. हा निकाल मंडळाच्या cbseresults.nic.in वर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या त्याच्या आधारे सीबीएसईमार्फत सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. सीबीएसईचा बारावीच्या परीक्षेला देशभरातून १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ११ लाख ९२ हजार ९६१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल यंदा ८८.७८ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ५.३८ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी ८३.४० टक्के निकाल लागला होता. यंदा बारावीची परीक्षा ४९८४ केंद्रावर झाली. बारावीच्या निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. मुलांंच्या तुलनेत ५.९६ टक्के अधिक मुलींचा निकाल लागला आहे. विभागामध्ये त्रिवेंद्रम ९७.६७ टक्के, बेंगळूरू ९७.०५ टक्के आणि चेन्नई ९६.१७ टक्के यांची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तर पुणे विभागाने ९०.२४ टक्क्याने १० क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दोन लाख विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

सीबीएसईचा जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात १ लाख ९६ हजार विद्यार्थ्यांना यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक टक्के मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५७ हजार ९३४ तर ९५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ६८६ इतकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -