घरCORONA UPDATELockDown: सीबीएसई १० वी - १२ वी बोर्डाचे परीक्षा वेळापत्रक जारी

LockDown: सीबीएसई १० वी – १२ वी बोर्डाचे परीक्षा वेळापत्रक जारी

Subscribe

सीबीएसई १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परिक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाच्या cbse.nic.in या संकेतस्थळवर हे वेळापत्रक जारी करण्यात आले असून या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक पाहता येणार आहे. दहावीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार पहिला पेपर १ जुलै रोजी सोशल सायन्सचा असणार आहे. तर २ जुलै रोजी सायन्स थिअरी आणि सायन्स प्रक्टिकल शिवाय होणार आहे. तिसरा पेपर १० जुलै रोजी हिंदी कोर्स ए आणि कोर्स बी हा पेपर होणार आहे. चौथा १५ जुलै रोजी इंग्लिश कम्युनिकेटिव्ह आणि इंग्लिश लॅग्वेज, लिटचा होणार आहे. तसेच बारावीच्या परिक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून २ जुलै रोजी हिंदीचा पेपर तर १ जुलै रोजी होम सायन्सचा पेपर असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LockDown : घरगुती अत्याचारामध्ये दिल्ली तिसऱ्या स्थानावर

विद्यार्थ्यांसाठी निय व अटी 

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अटी आणि नियम पाळणे गरजेचे असणार आहे. परिक्षेच्या वेळेस हँड सॅनिटायजर, ट्रान्सपरंट बॉटलमध्ये विद्यार्थ्याने बाळगायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने नाक, तोंड मास्कने झाकणे आवश्यक आहे. प्रत्येकाने सोशल डिस्टन्स बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परिक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई १० वी आणि १२ बोर्डाचे उर्वरित विषयांचे पेपर हे पुढे ढकलण्यात आले होते. यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबतच वेळापत्रक आज जाहीर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -