Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश CBSE Exam 2021 : सीबीएसई निकालांचा फॉर्मुला रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी पोहचले...

CBSE Exam 2021 : सीबीएसई निकालांचा फॉर्मुला रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी पोहचले कोर्टात

Related Story

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने बारावी बोर्डच्या सीबीएसई परीक्षांच्या निकालाच्या फॉर्म्युल्यास मंजुरी दर्शवली होती. परंतु या फॉर्म्युल्यास आव्हान देत सीबीएसईच्या काही विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. देशातील १० वी आणि १२वीच्या ११५२ विद्यार्थी सीबीएसई बारावीच्या कम्पार्टमेंट, प्रायवेट आणि रिपीटर्स परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात पोहचले आहेत.

सीबीएसई बोर्डाने नियमितपणे विद्यार्थ्यांप्रमाणे सीबीएसई आणि इतर शिक्षण मंडळाच्या मूल्यांकन पद्धतीनुसार बारावीच्या खासगी, कम्पार्टमेंट, रिपीटर्स विद्यार्थ्यांचे मूल्यांकनही वेळेत जाहीर करावे,अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. वकील मानव जेटली आणि वकील अभिषेक चौधरींच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

या याचिकेत सीबीएसई बोर्डच्या दहावीच्या खासगी, कम्पार्टमेंट, रिपीटर्सच्या परीक्षा फॉर्म्युल्यावर लवकर निर्णय घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. ११५२ विद्यार्थ्यांनी ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत यासंदर्भात काही सूचना देखील केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा २०२१ च्या सर्व खासगी, कम्पार्टमेंट, रिपीटर्स उमेदवारांचे आई-वडील आणि कुटुंबातील सदस्य़, शिक्षक वर्ग, आणि सर्व हितचिंतकांनी सुरक्षा, आरोग्याची काळजी घेत सीबीएसईने नोटिफिकेशन रद्द केले. असे याचिकाकर्त्यांनी कोर्टात सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाने सीबीएसई बोर्डाला ३ जूनपर्यंत बारावीच्या परीक्षांबाबत योजना तयार करत आदेश सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर १७ जूनपर्यंत सीबीएसई बोर्डाने आपला परीक्षा आणि निकालांचा फॉर्मुला कोर्टात सादर केला. त्याला सुप्रीम कोर्टानेही मंजुरी दर्शवली. पण या फॉर्म्युल्याला अनेक विभागातील विद्यार्थ्यांनी नामंजुरी दर्शवली असे या याचिकेत म्हणण्यात आले आहे. तसेच या फॉर्म्युल्यामुळे संविधानातील समानतेचा अधिकार कलम १४ चे उल्लंघन होत असल्याचे मतही याचिकाकर्त्यांनी मांडले आहे.

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्यात सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या नोटिसनुसार, कंपार्टमेंट, रिपिटिव्ह, प्रायवेट, करस्पॉंडेंट कोर्स इत्यादी परीक्षार्थांचे प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, इंटरनल असेसमेंट या वेगळ्या घेण्याऐवजी रेग्युलर विद्यार्थ्यांसोबतच घेतले जाणार असे सांगितले. यासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या तक्रारी देखील कोर्टात सांगितल्या जाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

पण कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीबीएसईसह अनेक बोर्डच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आली. तर बारावीची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. याआधी सीबीएसईने परीक्षांच्या निकालासाठी शाळांमध्ये फॉर्मेट पाठवला होता. या फॉर्मेटनुसार विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट वर्क, असाइनमेंट अशी माहिती मागवली होती. याआधारे अंतिम निकालाची तयारी केली जाणार आहे.


अखेर कोरोना विषाणूवर पहिले औषध सापडले, निर्मितीसाठी अमेरिका देणार ३.२ अब्ज डॉलर


 

- Advertisement -