घरदेश-विदेशCBSE Syllabus : सीबीएसईचा 10वी, 12वीचा अभ्यासक्रम जाहीर; आता 2 टर्ममध्ये होणार...

CBSE Syllabus : सीबीएसईचा 10वी, 12वीचा अभ्यासक्रम जाहीर; आता 2 टर्ममध्ये होणार नाहीत परीक्षा

Subscribe

सीबीएसईने (CBSE 2022-23) २०२२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अभ्यासक्रमात (CBSE Syllabus 2022-23) ) काही बदल केले आहेत. CBSE च्या नवीन अभ्यासक्रमानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम दोन टर्ममध्ये विभागला जाणार नाही. यामुळे सीबीएसईने दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रमुख विषयांचा अभ्यासक्रम देखील कमी केला आहे. यामुळे अभ्यासक्रमातील लेसनची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. CBSE अभ्यासक्रम 2022-23 अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic वरून डाउनलोड केला जाऊ शकतो.

कोविड-19 महामारीमुळे CBSE ने 2022 च्या अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये विभागल्या होत्या. CBSE टर्म-1 परीक्षा 2022 नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि टर्म-2 परीक्षा या महिन्यात म्हणजेच एप्रिल-मे 2022 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. CBSE इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होतील. तर आणि 24 मे रोजी 10वी आणि 15 जूनला 12वीची परीक्षा संपेल.

- Advertisement -

CBSE च्या इयत्ता 12 च्या अभ्यासक्रमानुसार, “मूल्यांकन योजनेमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमानुसार , प्रत्येक विषयासाठी सिद्धांत, अंतर्गत मूल्यांकन किंवा प्रॅक्टिकलचा समावेश असेल. बोर्ड 12वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेईल.


Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचे 121 नवे रुग्ण, मुंबईतील 68 रुग्णांची नोंद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -