Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश सीबीएसईचे वेळापत्रक जाहीर, 10वी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून होणार सुरू

सीबीएसईचे वेळापत्रक जाहीर, 10वी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून होणार सुरू

Subscribe

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे.

जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत ते सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.inवर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात. याशिवाय, https://www.cbse.gov.in/cbsenew या लिंकद्वारे सीबीएसईच्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेचे वेळापत्रक थेट पाहू शकतात. सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता 10वी सायन्सची परीक्षा 4 मार्च 2023 रोजी, तर गणिताची परीक्षा 21 मार्च 2023 रोजी होईल. सीबीएसई बोर्डाची बारावी रसायनशास्त्राची परीक्षा 28 फेब्रुवारी 2023ला तर जीवशास्त्राची परीक्षा 16 मार्च 2023 रोजी होणार आहे.

- Advertisement -

सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा 21 मार्च 2023 रोजी संपणार असून, 12वीच्या परीक्षा 5 एप्रिल 2023 रोजी संपणार आहेत. सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान पाळण्याची मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. सीबीएसईने 27 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 10वी आणि 12वीच्या CBSE बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख आधीच जाहीर केली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी 2023पासून सुरू होतील आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी संपतील. प्रात्यक्षिक परीक्षेची संपूर्ण तारीखपत्रक पाहण्यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट www.cbse.gov.in ला भेट देऊ शकतात. यासोबतच सीबीएसईने शाळांना 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या विद्यार्थ्यांचे ग्रेड आणि गुण अपलोड करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणाची भावाकडून हत्या, भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार

सीबीएसई 10वी आणि 12वी परीक्षेचे वेळापत्रक असे पाहू शकता –

  • सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जा.
  • सीबीएसईच्या 10वी आणि 12वी परीक्षा 2023 ची वेळापत्रक लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • एक PDF फाइल उघडेल.
  • सीबीएसी 10वी आणि 12वी परीक्षा 2023चे वेळापत्रक पाहा आणि ते सेव्ह करा.

हेही वाचा – मविआच्या नेत्यांकडून अविश्वास प्रस्ताव, पण अजित पवार अनभिज्ञ; नेमकं प्रकरण काय?

- Advertisment -