घरदेश-विदेशसीसीआयने इम्रान खान यांचे पोस्टर झाकले

सीसीआयने इम्रान खान यांचे पोस्टर झाकले

Subscribe

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील सीसीआय म्हणजेच क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे पोस्टर झाकले आहे.

जम्मू-काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याबद्दल सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी आता मुंबईतील सीसीआय म्हणजेच क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचे पोस्टर झाकले आहे. सीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात इम्रान खान यांचे चित्र लावण्यात आले होते.

सीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून मत मांडले

‘आम्ही इम्रान खान यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा आदर करतो. पण त्याचवेळी इम्रान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. आमचे जवान सीमेवर शहीद झाले असताना आम्ही त्याचे पोस्टर गौरव म्हणून ठेवू शकत नाही. त्यामूळे आम्ही हे पोस्टर झाकले आहेत’,अशी माहीती सीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

- Advertisement -

शहीद जवानांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार 

सीआरपीफच्या जवानांवर १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशदवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. तब्बल २०० किलो स्फोटके ठेवलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकवून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर देशातील सर्व जनतेकडून पाकिस्तानचा सूड घेण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. शनिवारी शहीद जवानांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -