घरताज्या घडामोडीCDS Bipin Rawat आणि १३ जणांच्या मृतदेहांची ओळख कशी पटली ? भारतीय...

CDS Bipin Rawat आणि १३ जणांच्या मृतदेहांची ओळख कशी पटली ? भारतीय सेनेचा खुलासा

Subscribe

तामिळनाडूच्या कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशच्या घटनेनंतर (Coonoor Helicopter Crash) च्या घटनेत हॅलिकॉप्टरमधील सर्वच प्रवासी हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. पण या घटनेत मृतदेहांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले होते. त्यामुओले भारतीय सेनेने या मृतदेहांची ओळख कशी पटवली याबाबतचा उलगडा केला आहे. अत्यंत कठीण अशा परिस्थितीत मृतांची ओळख पटवण्याचे आव्हान होते. पण शक्यतो सर्व पर्यायांचा अवलंब करत या मृतदेहांची ओळख पटविण्यात आली. भारतीय सेनेने ही ओळख पटवताना काय गोष्टींचा अवलंब केला आणि मृतदेहांना कसे ओळखले ही गोष्ट स्पष्ट केली आहे. (cds bipin rawat helicopter crash identification of dead bodies by all possible measures says indian army)

कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवणे अत्यंत कठी झाले होते. ही दुर्घटनाच इतकी भयानक होती की त्यामुळे घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख नुसत्या अवयवांवरून पटवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. अत्यंत कमी अवशेष हे दुर्घटनेनंतर सापडले. पण वैज्ञानिक उपाययोजनांचा वापर करत या अवशेषांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यासोबतच मृतांच्या नातेवाईकांचीही मदत यावेळी घेण्यात आली. सर्व प्रक्रियेनंतरच हे मृतदेह कुटुबीयांना सुपूर्द केले जाणार आहेत. त्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना दिल्लीला येण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

सर्वच प्रकारची मदत मृतांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत आहे. नातेवाईकांची संवेदनशीलता आणि भावनात्मकतेच्या दृष्टीकोनातून सगळी व्यवस्था करण्यात येत असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांचा पार्थिव देह हा नातेवाईकांकडे सोपावण्यात येईल. तसेच सैन्य परंपरेनुसार अंतिम संस्कार पुर्ण करण्यात येणार आहेत. आज गुरूवारी सकाळीच राजनाथ सिंह यांनी संसदेत संपुर्ण अपघातावर निवेदन सादर केले.

सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अंत्यसंस्कारासह सैन्य सन्मान देण्यात येणार आहे. इतर इतर सैनिकांचेही अंत्यसंस्कार सैन्य परंपरेने करण्यात येतील. या घटनेत फक्त ग्रुप कॅप्टन वरूण सिंह हे लाईफ सपोर्टवर आहेत. त्यांना काही वेळापूर्वीच एअरलिफ्ट करून बंगळुरू येथे आणण्यात आले आहे. या हेलीकॉप्टरमध्ये १४ लोक प्रवास करत होते. परंतु त्यांमधील १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यांममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा, हवालदार सत्पाल, ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे.

- Advertisement -

Bipin Rawat Chopper Crash: CDS… मी….. बिपीन रावत यांचे शेवटचे शब्द, बचावकर्त्याने सांगितला घटनाक्रम

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -