CDS Bipin Rawat Death: बिपीन रावत यांच्यासह १२ जणांचे पार्थिव नेत असताना रुग्णवाहिकेला अपघात

CDS Bipin Rawat mortal carrying Ambulances meet with an accident in Tamil Nadu
CDS Bipin Rawat Death: बिपीन रावत यांच्यासह १२ जणांचे पार्थिव नेत असताना रुग्णवाहिकेला अपघात

भारताचे पहिले संक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचा तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचा आणि ११ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तामिळनाडूमधून दिल्लीच्या दिशेने रावत यांच्यासह १२ जणांचे पार्थिव नेण्यात येत असताना रुग्णवाहिकांच्या ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना यामध्ये घडली नसून कोणालाही इजा झाली नाही. १३ जणांचे पार्थिव शरीर संध्याकाळपर्यंत दिल्लीत पोहचतील.

तामिळनाडूतील वेलिंग्टन येथे सीडीएस बिपीन रावत एका कार्यक्रमासाठी जात होते. हेलीकॉप्टरमधून जात असताना अपघात झाला. या हेलीकॉप्टरमधून त्यांच्यासह पत्नी आणि इतर १२ जण प्रवास करत होते. दुर्घटना घडल्यानंतर केवळ रावत आणि आणखी एका अधिकाऱ्याला वाचवण्यात यश आले होते परंतु रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच रावत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सीडीएस बिपीन रावत यांचे पार्थिव दिल्लीत शुक्रवारी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर कामराज मार्ग ते बरार चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. तसेच दिल्लीतील कॅन्टोनमेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तामिळनाडूमधून जेव्हा १३ रुग्णवाहिका पार्थिव घेऊन विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्या त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. १३ पार्थिव शरीर विमानतळावरुन भारतीय वायु सेनेच्या सी-१३०जे सुपर हरक्यूलिस परिवहन विमानातून नेण्यात येणार आहेत.

जखमी कॅप्टन सिंह यांना बंगळूरुला शिफ्ट करण्यात येणार

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेची माहिती दिली आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी घटनाक्रम सांगितला आहे. तसेच या दुर्घटनेत जे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना वाचवण्यात यश आले आहे. पंरतु ते सद्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर सैन्याच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना एअर एंबुलेंसच्या मदतीने बंगळूरुला शिफ्ट करण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.


हेही वाचा:  बिपीन रावत दुर्घटनेवर राजनाथ सिंहांची लोकसभेत महत्त्वाची माहिती, सारे स्तब्ध