घरताज्या घडामोडीCDS- बिपीन रावत होते 'सर्जिकल स्ट्राईक'चे सूत्रधार ,पाकिस्तान, चीनची उडवली झोप

CDS- बिपीन रावत होते ‘सर्जिकल स्ट्राईक’चे सूत्रधार ,पाकिस्तान, चीनची उडवली झोप

Subscribe

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात देशाचे सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर २०१९ रोजी बिपिन रावत यांची देशाचे पहीले सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या ३७ वर्षांच्या कार्यकिर्दीत चीन आणि पाकिस्तानलाही त्यांनी अनेकवळा जशास तसे उत्तर देत भारताची ताकद दाखवली होती. उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमागेही रावत होते. यामुळे चीन आणि पाकिस्तान रावत यांना टरकून होते.

जानेवारी १९७९ साली बिपिन रावत यांची मिझोराम येथे प्रथम नियुक्ती करण्यात आली होती. कडक शिस्त, वक्तशीरपणा, अचूक निर्णय या जोरावर रावत यांनी अनेकवेळा पाकिस्तान आणि चीनी सैनिकांना पळता भुई थोडी केली होती. यामुळे या दोन्ही देशातील संरक्षण विभाग रावत यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असे.

- Advertisement -

उत्तराखंड येथील पौढी गढवाल जिल्ह्यात १६ मार्च १९५८ साली बिपीन रावत यांचा जन्म झाला होता.

त्यांचे वडील एसएस रावत हे देखील भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते.

- Advertisement -

बिपीन रावत यांना डेहराडून येथील आयएमए डेहराडून येथे सोर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते.

२०११ साली चौधरी चरण सिंह विश्वविद्यालयातून त्यांनी सैन्य मिडियावर पीएचडीही मिळवली होती.

१ सप्टेंबर २०१६ रोजी रावत यांच्यावर लष्कराच्या उप प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

बिपीन रावत यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्यालगतच्या सीमांची जबाबदारी सांभाळली होती. लष्कराची अनेक पदे त्यांनी भूषवली होती. युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक यांसह विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.

मणिपुरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर सीमापार म्यांनमार मध्ये जनरल बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात एनएससीएनचे तळ उध्वस्त करण्यात आले होते. तसेच अनेक बंडखोरांचा खात्मा करण्यात आला होता. यात २१ पॅरा कमांडोंचा समावेश होतो. त्यावेळी रावत हे थर्ड कार्प्‍सच्या बटालियनचे कमांडर होते.

म्यानमारच्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकनंतर सरकारचा रावत यांच्यावरील विश्वासही अधिक दृढ होत गेला. त्याचपार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर २०१६ रोजी रावत यांना तिन्ही दलाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. या सेक्टरमध्ये काम करताना रावत यांना पूर्व सेक्टरमधील एलओसी, ज्याच्या आजूबाजूच्या अशांत भागांचा आणि कश्मिरमध्ये काम करण्याचा बराच अनुभव मिळाला.

उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची जबाबदारी बिपीन रावत यांच्या खांद्यावर होती. यातूनच रावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानमध्ये घूसुन सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली होती.

त्याआधी त्यांनी १९७८ साली लष्कराच्या ११ व्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियन नेतृत्व केले होते. १९८६ साली चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर तैनात इनफ्रेंट्री बटालियनचे प्रमुख म्हणून रावत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. जनरल रावत यांनी कश्मीरच्या १९ व्या इन्फेंट्री डिविजनचेही नेतृत्व केले होते. त्यांनी देशच नाही तर संयुक्त राष्ट्राच्या अभियांनांमध्येही भारताचे नेतृत्व केले आहे. २०१६ सप्टेंबरला त्यांना उप लष्कर प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच त्यांना युद्ध सेवा पदक, सेना पदक, उत्तर यद्ध सेवा पदक. एवीएसएम, परदेश सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले होते.

 

 

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -