‘या’ कंपनीची सिमेंटच्या प्रती गोणीची खरेदी महागणार

देशातल्या सिमेंट कंपनीमध्ये प्रमुख असणाऱ्या इंडिया सिमेंट कंपनीने (India Cement Company) आपल्या सिमेंटच्या दरात प्रति गोणी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रति गोणी 55 रुपयांनी वाढ केली असून, टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.

देशातल्या सिमेंट कंपनीमध्ये प्रमुख असणाऱ्या इंडिया सिमेंट कंपनीने (India Cement Company) आपल्या सिमेंटच्या दरात प्रति गोणी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रति गोणी 55 रुपयांनी वाढ केली असून, टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा दरवाढीचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे आता घर बांधणे आणि खरेदी करणे आणखी महागणार आहे.

इंडिया सिमेंट कंपनी जून ते जुलै यादरम्यान तीन टप्प्यांत दरवाढ केली जाणार आहे. 1 जून रोजी प्रति गोणी 20 रुपये, त्यानंतर 15 जून रोजी 15 रुपये आणि एक जुलै रोजी 20 रुपये अशी ही दरवाढ करण्यात येणार आहे. कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

26 हजार एकर जमीन

“कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन भांडवल उभारण्यासाठी काही जमीन विकणार आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आमच्याकडे जवळपास 26 हजार एकर जमीन आहे. या जमिनी वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत. तसेच, प्रत्येक गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. आम्ही दरवाढ न केल्यास आम्हाला मोठा तोटा होईल”, असे एन. श्रीनिवासन यांनी सांगितले.

इंडिया सिमेंटचे आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये एकूण उत्पन्न 4,729.83 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये तिचे एकूण उत्पन्न 4,460.12 कोटी रुपये होते. मात्र, या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा झपाट्याने घसरून रु. 38.98 कोटी झाला आहे.


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरात दौऱ्यावर