घरताज्या घडामोडीCorona update : कोरोनाची लाट थोपवण्यासाठी केंद्राकडून पाच सूत्री धोरणाची शिफारस

Corona update : कोरोनाची लाट थोपवण्यासाठी केंद्राकडून पाच सूत्री धोरणाची शिफारस

Subscribe

राज्यांना कठोर उपाययोजना करण्याचे केंद्राचे निर्देश

महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जास्त संख्येने दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद सुरुच आहे. देशात आतापर्यंत २४ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांशी( आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि महापालिका आयुक्तांशी आणि कोविड-19 मुळे सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येची झळ पोहोचलेल्या आणि चढा मृत्यूदर असलेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली. कोविड महामारीची ही लाट थोपवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच सूत्री धोरणाची शिफारस केली. महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांचा त्यात समावेश आहे.

लसीकरणात ६ कोटींचा टप्पा पुर्ण

दुसरीकडे कोविड-19 विरुद्धच्या संघर्षामध्ये भारताने अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आहे. देशाने लसीकरण मोहिमेत 6 कोटी मात्रा देण्याचा टप्पा ओलांडला आहे. आज रविवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या अंतरिम अहवालानुसार 9,85,018 सत्रांमध्ये लसींच्या 6,02,69,782 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 81,52,808 आरोग्य कर्मचारी( पहिली मात्रा), 51,75,597 आरोग्य कर्मचारी( दुसरी मात्रा) आणि आघाडीवर काम करणारे 88,90,046 कर्मचारी( पहिली मात्रा) आणि आघाडीवर काम करणारे 36,52,749 कर्मचारी( दुसरी मात्रा) आणि विशिष्ट सहव्याधी असणारे 45 वर्षांवरील 66,73,662 लाभार्थी( पहिली मात्रा) आणि 60 वर्षांवरील 2,77,24,920 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या एकूण मात्रांमध्ये आठ राज्यांचा 60 टक्के वाटा आहे. या आठ राज्यांनी लाभार्थ्यांना प्रत्येकी 30 लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या आहेत. लसीकरण मोहिमेच्या 71व्या दिवशी( 27 मार्च 2021) 21,54,170 मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 39,778 सत्रांमध्ये 20,09,805 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आणि 1,44,365 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या 1,44,365 कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या सात राज्यांमध्ये दैनंदिन नव्या कोविड रुग्णांच्या सर्वाधिक संख्येची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात नोंद झालेल्या एकूण 62,714 रुग्णांपैकी या राज्यांमध्ये 81.46 टक्के रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्णांची नोंद

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या नव्या रुग्णांमध्ये आठ राज्यांचा मिळून 84.74 टक्के वाटा आहे. दैनंदिन रुग्णांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त 35,726 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 3162 तर कर्नाटकमध्ये 2886 रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांशी( आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि महापालिका आयुक्तांशी आणि कोविड-19 मुळे सातत्याने वाढणाऱ्या रुग्णंसंख्येची झळ पोहोचलेल्या आणि चढा मृत्यूदर असलेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली आणि कोविड महामारीची ही लाट थोपवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच सूत्री धोरणाची शिफारस केली. महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांचा त्यात समावेश आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे देशाचा कोविड संक्रमणाचा एकूण दर 5 टक्क्यांच्या खाली कायम राहिला असून भारताने 24 कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -