फाळणीनंतर भारतात पहिल्यांदाच ५० लाख मृत्यूला कोरोना जबाबदार – अमेरिकेतील संशोधन

RBI new rules about check payment
चेक पमेंटच्या नियमांमध्ये झाले महत्वपूर्ण बदल, सुट्टीच्या दिवशीही होणार चेक पास

भारतामध्ये ५० लाख इतक्या मोठ्या प्रमाण रूग्णांनी जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीत जीव गमावला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जाणे ही देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात भारत पाक फाळणीनंतरची सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. कोरोनाच्या दोन लाटांनंतर आता डेल्टाचे नवनवीन व्हेरियंट हे जगभरात नव्या लाटेची चाहूल देत असल्याचेही निदर्शनास आले आहे. वॉशिंग्टन स्थित सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने केलेल्या अभ्यासानुसार हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. सेरॉलॉजिकल अभ्यास, घरोघरी झालेले सर्वेक्षण आणि राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळालेली आकडेवारी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या डेटावर आधारीत हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. सरकारी आकडा हा ४ लाख असला तरीही प्रत्यक्षात मात्र हा आकडा मोठा असल्याचा अभ्यासातील निष्कर्ष आहे. अवघ्या सात राज्यातूनच सरकारी आकडेवारीपेक्षा ३४ लाख अधिक मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे.

आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार भारतात झालेल्या सेरो सर्वेक्षणानुसार चाळीस लाख लाख इतक्या मोठ्या प्रमाणात ही मृत्यूची आकडेवारी आहे. घरोघरी झालेल्या सर्वेक्षणात जवळपास ४९ लाख अधिक मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी जास्त आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा अनेक पटीने मृत्यू झाल्याची आकडेवारी तीन पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. भारताला दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचे संकट हाताळता आले नसल्याचा परिणाम हा इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यूचे कारण ठरलेला आहे. त्यामुळेच मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये २० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मांडण्यात आली आहे. भारतासोबतच आता पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्या व्हेरीयंटचा आकडा वाढत आहे. अमेरिकन नागरिकांमध्ये ज्यांनी लस घेतली नाही, अशा नागरिकांमध्ये या डेल्टा व्हेरीयंटचे प्रमाण आढळत आहे. या आकडेवारीत ६६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. अमेरिकेच्या सीडीसीच्या आकडेवारीनुसार ९९ टक्के कोरोनाचे मृत्यू हे ज्यांनी लस घेतली नाही अशा व्यक्तींचे झाले आहेत. तर रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ९७ टक्के नागरिकांनी लस घेतली नसल्याचे आढळले आहे.

एकुण तीन टप्प्यांमध्ये हा अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सेरोलॉजिकल सर्वेक्षण, घरगुती सर्वेक्षण आणि राज्य सरकारची आकडेवारी अशा तीन प्रकारच्या आकडेवारीतून हा डेटा समोर आला आहे. यामध्ये सात राज्यांमध्ये प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला होता. पण भारतातील अनेक राज्यांनी अधिकृतपणे दिलेला आकडा आणि प्रत्यक्षात झालेले मृत्यू यामध्ये मोठी तफावत आढळल्याचे या संपुर्ण अभ्यासातून समोर आले आहे.