Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Oxygen Shortage : देशातील रुग्णालयात उभारण्यात येणार ५५१ ऑक्सिजन प्लॅंट, केंद्राचा मोठा...

Oxygen Shortage : देशातील रुग्णालयात उभारण्यात येणार ५५१ ऑक्सिजन प्लॅंट, केंद्राचा मोठा निर्णय

पीएम केअर फंडातून १६२ ऑक्सिजन प्लांट स्थापनेसाठी २०१.५८ कोटी वाटप

Related Story

- Advertisement -

राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. देशात सर्वच राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची कमी दुर करण्यासाठी केंद्र सरकारने देशात एकूण ५५१ मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभारण्याला मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींन याबाबत लवकरात लवकर प्लांट सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्लांटसाठी लागणारा खर्च पीएम केअरमधून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात हे मेडिकल प्लांट उभारण्यात येतील. त्यामुळे सर्व जिल्ह्यात लवकरात लवकर मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लांटसाठी पीएम केअरमधून निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच हे ऑक्सिजन प्लांट लवकर उभारुन कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्लांटमुळे ऑक्सिजनची कमतरता भरुन निघणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही ऑक्सिजन यंत्रणा बसवण्यात येत आहे. वर्षाच्या सुरुवातीला पीएम केअर फंडातून १६२ ऑक्सिजन प्लांट स्थापनेसाठी २०१.५८ कोटी वाटप करण्यात आले आहेत. या योजनेमुळे जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

- Advertisement -

तसेच जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये आणि कोरोना रुग्णांना व इतर रुग्णांना ऑक्सिजन नियमित ऑक्सिजन मिळेल. लिक्वि़ड मेडिकल ऑक्सिजन कॅप्टिव ऑक्सिजनच्या बाबतीत टॉप अप म्हणूनन काम करेल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हेच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यामागचे खर कारण आहे. इन-हाऊस-कॅप्टिव ऑक्सिजनची सुविधा रुग्णालये आणि जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजनची गरज पुर्ण करेल.

- Advertisement -