घरताज्या घडामोडीतीन दिवसांमध्ये महाराष्ट्राला मिळणार ३ लाख लसीचे डोस, केंद्राचा खुलासा

तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राला मिळणार ३ लाख लसीचे डोस, केंद्राचा खुलासा

Subscribe

येत्या १ मे पासून लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत १५ कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. महाराष्ट्राला पुढील तीन दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने ३ लाख लसींचे डोस पुरवणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. येत्या १ मे पासून लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून यामध्ये १८ ते ४५ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर आतापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकार पुढील ३ दिवसात ८० लाख कोरोना लसींचे डोस राज्यांना पुरवणार आहे. यामध्ये महाराष्ट्राला ३ लाख डोस देण्यात येणार आहे. राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने लसीकरण केंद्रे बंद करण्यात येत आहे. महाराष्ट्राला पुढील ३ दिवसात ३ लाख कोरोना लसीचे डोस देण्यात येणार आहेत. तसेच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत अजूनही १ कोटी लसीकरण डोस उपलब्ध असल्याची माहितीही केंद्र सरकारने दिली आहे.

- Advertisement -

१ मे पासून १८ वर्षांवरील कोरोना लस

राज्यात १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या नागरिकांचे लसीकरण करण्याचा भार केंद्र सरकारने राज्य सरकारवर टाकला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या खांद्यावरील भार वाढला आहे. आतापर्यंतच्या कोरोना परिस्थितीवर राज्य सरकारने बक्कळ खर्च केला असल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरिवर भार आला आहे. यामुळे राज्य सरकार १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या समोर उपस्थित झाला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -